मला स्मार्ट कार्ड कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:46+5:302021-06-16T04:10:46+5:30

नागपूर : कर्मचारी निवृत्त झाला की कर्मचारी कंपनीचे काही देणेघेणे लागत नाही, अशी स्थिती आज सर्वत्र दिसून येते. असाच ...

When will I get a smart card? | मला स्मार्ट कार्ड कधी मिळणार?

मला स्मार्ट कार्ड कधी मिळणार?

नागपूर : कर्मचारी निवृत्त झाला की कर्मचारी कंपनीचे काही देणेघेणे लागत नाही, अशी स्थिती आज सर्वत्र दिसून येते. असाच काहीसा प्रकार ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी येथील निवृत्त कर्मचारी शंकर सदाशिव डांगे यांच्यासोबत घडलेला दिसतो. फॅक्टरीतर्फे प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्यांला स्मार्ट कार्ड दिले जाते. निवृत्तीनंतरचे व्यवहार, कॅन्टीन आदीसाठी ते उपयुक्त असते. डांगे सप्टेंबर २००१ मध्ये निवृत्त झाले. मात्र, त्यांना अजूनही स्मार्ट कार्ड मिळालेले नाही. ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांनी नव्या नियमानुसार फाॅर्मही भरला. मात्र, त्यानंतर कधी प्रतिसाद मिळालेला नाही. कॅन्टीनमध्ये साहित्याची खरेदी करण्यासाठी गेले असता, तेथेही योग्य उत्तर दिले जात नाही. एका निवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या अधिकारापासून वंचित केले जात असल्याची भावना शंकर सदाशिव डांगे यांनी व्यक्त केली आहे.

.................

Web Title: When will I get a smart card?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.