सावकारी कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:54+5:302021-07-28T04:08:54+5:30

भिवापूर : सावकारी कर्जमाफी योजनेतून सुरुवातीला कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते. नंतर सुधारित परिपत्रक काढण्यात आले; मात्र अद्यापही कार्यक्षेत्राबाहेरील ...

When will I get the benefit of loan waiver? | सावकारी कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार?

सावकारी कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार?

भिवापूर : सावकारी कर्जमाफी योजनेतून सुरुवातीला कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते. नंतर सुधारित परिपत्रक काढण्यात आले; मात्र अद्यापही कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सुधारित परिपत्रकानुसार सावकारी कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार, असा प्रश्न विचारत उपसरपंच संघटनेने उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांना मंगळवारी निवेदन दिले.

राज्यात महायुतीचे सरकार असताना सावकारी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली; मात्र अनेक सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज दिले होते. अशा शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफीचा लाभ मिळालेला नव्हता. याची दखल घेत, शासनाने सुधारित परिपत्रक काढत, कार्यक्षेत्राबाहेरील सावकारी कर्जदार शेतकऱ्यांचा योजनेत समावेश करून घेतला; मात्र अद्यापही या सुधारित परिपत्रकानुसार शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. सरांडी, शिवापूर, मालेवाडा, चिचाळा, पाहमी, मांगरुळ ही गावे भिवापूर तालुक्यातील असली तरी येथील शेतकऱ्यांना उमरेड शहर अगदी जवळ असल्यामुळे त्यांचे बहुतांश आर्थिक व्यवहार उमरेड येथे करतात. शिवाय भिवापूर तालुका शेवटच्या टोकावर असून भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावे शहरालगत आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी भिवापूर येथून सावकारी कर्ज घेतले. सावकाराने कार्यक्षेत्राबाहेर कर्ज वितरण केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत सुधारित परिपत्रकही निघाले; मात्र प्रशासनाला कदाचित त्याचा विसर पडलेला आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रवी मलवंडे, प्रफुल्ल पिंपळकर, प्रकाश पाटील, सुमित आळे, दीपक आसटकर आदींचा समावेश होता.

270721\img_20210727_170326.jpg

उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांना निवेदन देतांना उपसरपंच संघटनेचे शिष्टमंडळ

Web Title: When will I get the benefit of loan waiver?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.