हिंगणा - कान्होलीबारा मार्गाला कधी मिळणार ‘नवा लुक’ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:19+5:302021-02-11T04:09:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वानाडोंगरी : हिंगणा तालुक्यातून जाणारा हिंगणा - कान्होलीबारा राज्यमार्ग खड्डेमय झाला आहे. या मार्गाची आतापर्यंत पाच ...

हिंगणा - कान्होलीबारा मार्गाला कधी मिळणार ‘नवा लुक’ ?
लोकमत न्यूज नेटवर्क
वानाडोंगरी : हिंगणा तालुक्यातून जाणारा हिंगणा - कान्होलीबारा राज्यमार्ग खड्डेमय झाला आहे. या मार्गाची आतापर्यंत पाच ते सहावेळा डागडुजी करण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याच्या नावावर केवळ मुरूम आणि माती टाकण्यात आली. या मार्गावरील आमगाव देवळी ते कान्होलीबारापर्यंतचा ९ किलोमीटरचा मार्ग खड्डेमय झाला आहे. या राज्य महामार्गाचे काम हिंगणा केळझर रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. मात्र, याच मार्गावरील आमगाव देवळी ते कान्होलीबारा हा ९ किलोमीटरचा मधलाच मार्ग नूतनीकरणामध्ये येत नसल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, संपूर्ण मार्गाचे नव्याने काम करताना केवळ ९ किलोमीटरचा हा मार्ग का सोडण्यात आला, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कान्होलीबारा ते हिंगणा हा २० किलोमीटरचा मार्ग आहे. याच मार्गाने कान्होलीबारा आणि परिसरातील ग्रामीण भागातील जनता ये-जा करते. याच मार्गाने सर्व शासकीय कर्मचारी, खासगी कंपनीत जाणारे कामगार व विद्यार्थी ये-जा करतात. मात्र, हा मार्ग खड्डेमय बनल्याने मार्गाने जाताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार केवळ माती-गोट्याने आणि मुरमाने दुरुस्ती केली जाते. हा राज्यमार्ग असूनही याठिकाणी खड्डे दुरुस्तीसाठी डांबर-गिट्टीचा वापर केला जात नसल्याचे नाराजी व्यक्त होत आहे.