हरभऱ्याचे खरेदी केंद्र सुरू हाेणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:18+5:302021-03-04T04:12:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : नाफेडमार्फत हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नाेंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत ३०० वर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाेंदणी ...

हरभऱ्याचे खरेदी केंद्र सुरू हाेणार कधी?
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : नाफेडमार्फत हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नाेंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत ३०० वर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाेंदणी केली. परंतु अद्यापही खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने हे केंद्र सुरू हाेणार तरी कधी, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
सध्या हरभरा पिकाची कापणी व मळणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदीसाठी ऑनलाईन नाेंदणी सुरू केली आहे. शेतमालाला याेग्य भाव मिळावा, यासाठी शासनाने शेतकऱ्यांचा शेतमाल किमान आधारभूत किमतीत खरेदी करण्याचे धाेरण अवलंबिले आहे. त्यानुसार नाफेडमार्फत दरवर्षी हरभरा खरेदी केला जाताे. नोंदणी व खरेदीसाठी नाफेडने भिवापूर खरेदी विक्री संस्थेची निवड केली आहे.
१५ फेब्रुवारीपासून खरेदी विक्री संस्थेच्या कार्यालयात हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी सातबारा व इतर आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर खरेदी विक्री संस्थेतील यंत्रणा ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करते. त्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर खरेदीबाबतचे शेड्युल्ड मॅसेज पाठविले जातात. नोंदणी सुरू झाली असली तरी, अद्याप खरेदीबाबत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे नाफेडचे खरेदी केंद्र कधी सुरू होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. पीक हाती आल्यानंतर अधिक काळ साठवून ठेवणे अडचणीचे ठरते. दुसरीकडे आर्थिक अडचणींमुळे शेतकरी शेतमालाची लवकर विक्री करणे पसंत करतात. त्यामुळे हे केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.