शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोहणे शिकणाऱ्यांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:28 IST

पोहणे शिकायला गेलेल्या नवीन श्रीराव याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. शहरातील काही जलतरण तलाव म्हणजे निव्वळ गल्लाभरू झाले आहेत. बहुसंख्य तलावावर सुरक्षेबाबत व आरोग्याच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीचे सूर या घटनेने उमटत आहे. पोहणे शिकणाऱ्यांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देलोकमत जागर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोहणे शिकायला गेलेल्या नवीन श्रीराव याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. शहरातील काही जलतरण तलाव म्हणजे निव्वळ गल्लाभरू झाले आहेत. बहुसंख्य तलावावर सुरक्षेबाबत व आरोग्याच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीचे सूर या घटनेने उमटत आहे. पोहणे शिकणाऱ्यांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.शाळेला सुट्या लागल्या आहेत. अनेक लहान मुले, तरुणांची जलतरण तलावांवर गर्दी होत आहे. यामुळे बहुसंख्य जलतरण तलावाच्या बॅचेस फुल्ल आहेत. एकट्या मेडिकलच्या जलतरण तलावावर सकाळ व रात्रीच्या मिळून १० बॅचेस चालतात. एका बॅचमध्ये ५० ते ६० विद्यार्थी आहेत. अशी स्थिती सर्वच तलावांवरची आहे. परंतु सुरक्षेबाबत हवे तेवढे गांभीर्य पाळत नसल्याचे या क्षेत्रातील खुद्द प्रशिक्षकांचे मत आहे. त्यांच्यानुसार, पोहणे शिकणाऱ्याची सुरक्षा हे पहिले प्राधान्य असले पाहिजे. यासाठी दक्ष ‘लाईफ गार्ड’ व योग्य प्रशिक्षक असणे गरजेचे आहे. परंतु यावर कुणाचे नियंत्रण नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यकतज्ज्ञाच्या मते, पोहणे शिकण्यासाठी येणाऱ्यांपासून ते पोहण्यासाठी येणाºयांना शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु या प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष केले जाते. कोणतीही खातरजमा न करता अनेक जण पोहत आहेत. याचे गंभीर परिणाम नंतर भोगावा लागतात. संसर्गजन्य आजाराचे प्रमाणही यातून फैलण्याची भीती असते.नखे वाढलेले, जखमीही नकोजलतरण तलावावर नखांची वाढ असलेल्या व्यक्तीला पोहण्यास नियमानुसार बंदी असते. जखमी व्यक्ती अथवा फिट आदी व्याधी असलेल्या कुणालाही जलतरण तलावावर पोहण्यास बंदी आहे. परंतु, शारीरिक व्याधीग्रस्त व्यक्तींच्या तंदुरुस्तीबाबतची कोणतीही तपासणी केली जात नाही.पोहणे शिकणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचेपोहणे शिकणाऱ्यांनी सर्वात प्रथम योग्य जलतरण तलाव व प्रशिक्षकांची माहिती घेऊनच क्लासेस लावावे. प्रशिक्षकांनी सांगितल्यानंतरच कंबरेला ‘फ्लोट’ बांधूनच पाण्यात उतरावे. ‘फ्लोट’ची गाठ योग्यरीत्या बांधल्याची खातरजमा करावी. पाण्यात क्लोरिनचे प्रमाण अधिक असल्यास डोळ्यात जळजळ होऊन त्रास होण्याची शक्यता असते. त्यासाठी गॉगल्सचा वापर करावा. प्रशिक्षकांनी सांगितल्याखेरीज पाण्यात उडी मारू नये. लहान मुले पोहत असतील तर पालकांनीही याकडे लक्ष द्यायला हवे.

टॅग्स :SwimmingपोहणेDeathमृत्यूnagpurनागपूर