वर्धा जिल्हा बँकेची निवडणूक कधी घेता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 21:47 IST2018-06-29T21:46:29+5:302018-06-29T21:47:25+5:30
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक कधी घेता अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे. तसेच, सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १७ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

वर्धा जिल्हा बँकेची निवडणूक कधी घेता?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक कधी घेता अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे. तसेच, सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १७ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
यासंदर्भात संजय कामनापुरे व इतर चौघांनी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. बँकेच्या संचालक मंडळाची मागील निवडणूक ९ आॅगस्ट २००८ रोजी झाली. त्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ ८ आॅगस्ट २०१३ रोजी संपला. त्यानंतर संचालक मंडळाने राजीनामे दिल्यामुळे बँकेवर दोन सदस्यीय प्रशासक मंडळ बसविण्यात आले. त्या प्रशासक मंडळाची सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर २४ एप्रिल २०१५ रोजी वर्धा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय प्रशासक मंडळ बसविण्यात आले. ही पर्यायी व्यवस्था बंद करून बँकेची सर्वसाधारण निवडणूक तातडीने घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. पंकज तिडके यांनी बाजू मांडली.