शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील रात्रशाळांचा अंधार कधी होणार दूर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:36 IST

शासनाने २०१७ मध्ये रात्रशाळाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतला होता. पण त्या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नसल्याने रात्रशाळाचा अंधारच दूर होऊ शकला नाही.

ठळक मुद्दे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासनाने २०१७ मध्ये रात्रशाळाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतला होता. पण त्या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नसल्याने रात्रशाळाचा अंधारच दूर होऊ शकला नाही.राज्यात २५० रात्रशाळा असून येथे हजारावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. विभागात १४ तर जिल्ह्यात १२ रात्रशाळा आहेत. त्यात अडीचशे शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. काम करून शिकता यावे यासाठी रात्रशाळाची सुरुवात झाली. मात्र, या शाळांना अद्यापही न्याय मिळाला नाही. शासनाच्या धोरणात्मक निर्णयाकडे गांभीर्याने पाहून शासनाने रात्रशाळांना दिवस शाळेप्रमाणे पूर्णवेळ दर्जा देऊन शैक्षणिक असमानता व भेदभाव दूर करावा, अशी मागणी रात्रशाळा कृती समितीची आहे. शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे शिक्षकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. शासन निर्णय १७ मे २०१७ च्या निर्णयानुसार दुबार सेवेत असणाऱ्या शिक्षकांच्या सेवा समाप्त केल्या आहेत. रात्रशाळेत दुबार नोकरी करता येणार नाही, यासंबंधी उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. असे असतानाही काही संघटना शासन निर्णयानुसार त्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी शासनाकडे करीत आहेत. मात्र, या मागणीला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यामुळे शासनाने रात्रशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व शासनाच्या निर्णयाप्रमाणे सर्व लाभ देऊन त्यांची उपेक्षा थांबविण्याची मागणी होत आहे. आजपर्यंत रात्रशाळांच्या पदरी कायम निराशाच आली आहे. शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊनही तो अद्यापही लागू होत नाही. त्यामुळे शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांनी रात्रशाळांचे गांभीर्य लक्षात घेऊन पूर्णवेळेचा दर्जा द्यावा, अशी मागणी रात्रशाळा कृती समितीचे अध्यक्ष सुनील ठाणेकर यांनी केली आहे.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर