रानबाेडी येथील ५७ कुटुंबांना भूखंड, पॅकेज मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:50+5:302021-06-20T04:07:50+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यांतर्गत येणाऱ्या रानबोडी (ता. कुही) या गावाचे उमरेड शहराजवळ पुनर्वसन करण्यात आले. शासकीय ...

When will 57 families from Ranbaedi get plots and packages? | रानबाेडी येथील ५७ कुटुंबांना भूखंड, पॅकेज मिळणार कधी?

रानबाेडी येथील ५७ कुटुंबांना भूखंड, पॅकेज मिळणार कधी?

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यांतर्गत येणाऱ्या रानबोडी (ता. कुही) या गावाचे उमरेड शहराजवळ पुनर्वसन करण्यात आले. शासकीय अधिकारी व पुनर्वसन समितीतील सदस्यांनी चुकीचे मापदंड लावून नियमबाह्य पद्धतीने मूळ गावठाणातील (गाव नमुना ८ मधील) ५७ लाभार्थ्यांना लाभापासून वंंचित ठेवले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना घरांच्या बांधकामासाठी भूखंड व पॅकेजचा लाभ कधी मिळणार, असा प्रश्न पीडितांनी उपस्थित केला आहे.

आपली कैफियत शासकीय अधिकारी व स्थानिक लाेकप्रतिनिधींकडे अनेकदा मांडली. मात्र, कुणीही न्याय दिला नाही, असेही लाभार्थ्यांनी सांगितले. दुसरीकडे दप्तर दिरंगाईमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे लाेकप्रतिनिधी सांगतात. लाेकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेच्या मूलभूत समस्या साेडविताना भेदभाव करू नये. या समस्या संवैधानिक मार्गाने सोडवाव्या. जनतेला त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवू नये. प्रशासनाने लाभार्थ्यांच्या समस्या तातडीने साेडवाव्या, अशी मागणी राजानंद कावळे, परसराम वंजारी, रामकृष्ण रिठे, कीर्तीलाल वंजारी, फुकट, राजू मेश्राम यांनी राज्याचे मुख्य सचिव एस. कुंटे यांना पाठविलेल्या पत्रात केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: When will 57 families from Ranbaedi get plots and packages?