सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST2021-02-16T04:10:21+5:302021-02-16T04:10:21+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : सावनेर तालुक्यातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असलेल्या खापा येथे गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या पडक्या ...

When is a well-equipped veterinary clinic? | सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना कधी?

सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना कधी?

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : सावनेर तालुक्यातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असलेल्या खापा येथे गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या पडक्या घरात पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे. शिवाय येथे डाॅक्टर नाही. यामुळे गुरांच्या उपचारासाठी शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. वेळप्रसंगी अधिकचे पैसे माेजून खासगी डाॅक्टरांकडून गुरांवर उपचार करावे लागतात. त्यामुळे सुसज्ज इमारतीसह पशुवैद्यकीय दवाखाना कधी हाेणार, असा सवाल शेतकरी व पशुपालक विचारत आहेत.

पशुवैद्यकीय दवाखानाअंतर्गत खापा शहरासह परिसरातील १७ गावांचा समावेश आहे. परंतु पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून जैसे थे आहे. दुसरीकडे येथे डाॅक्टर नसल्याने गुरांवर उपचार करण्यासाठी भरमसाठ पैसे माेजावे लागत असल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. पशुपालकांची अडचण लक्षात घेता क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी याकडे लक्ष पुरवून सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या तीन वर्षांत परिसरात विविध राेगांची लागण झाल्याने शेळ्या व गायी व इतर जनावरांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. यात शेतकऱ्यांचे माेठे आर्थिक नुकसान झाले. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिसरातील गावातील पशुपालक व शेतकरी आपली जनावरे उपचारासाठी आणतात. परंतु एका पडक्या घरात सुरू असलेल्या येथील दवाखान्यात गेल्या कित्येक वर्षांपासून डाॅक्टर उपलब्ध नाही. तसेच या ठिकाणी आवश्यक साेयीसुविधा नसल्याने पशुपालकांना खासगी डाॅक्टरांकडे धाव घ्यावी लागते. शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची मागणी अनेकदा केली. परंतु संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे खापा शहरात सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती करून येथे डाॅक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.

Web Title: When is a well-equipped veterinary clinic?