रेवराल-राजाेली-काेदामेंढी मार्गाची दुरुस्ती कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:03+5:302021-03-14T04:09:03+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातील रेवराल-राजाेली-काेदामेंढी हा मार्ग २५ गावांना जाेडला आहे. दुरुस्तीअभावी या मार्गाची दैनावस्था झाली ...

When was the Revaral-Rajaeli-Kaedamendhi road repaired? | रेवराल-राजाेली-काेदामेंढी मार्गाची दुरुस्ती कधी?

रेवराल-राजाेली-काेदामेंढी मार्गाची दुरुस्ती कधी?

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यातील रेवराल-राजाेली-काेदामेंढी हा मार्ग २५ गावांना जाेडला आहे. दुरुस्तीअभावी या मार्गाची दैनावस्था झाली असून, खड्ड्यांमुळे त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. शिवाय, अपघाताचा आलेखही चढता आहे. राेडवरील खड्डे माेठ्या अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता बळावल्याने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

धर्मापुरी, तांडा, मोरगाव, रेवराल, खंडाळा, पिपरी, आष्टी, नवरगाव, चारभा, राजोली, नांदगाव, कोदामेंढी, सुंदरगाव, मांगली (तेली), आजनगाव, धामणगाव, निमखेडा, अरोली यासह एकूण २५ गावांमधील नागरिक व विद्यार्थी रेवराल-राजाेली-काेदामेंढी मार्गाचा वापर माैदा शहरासह अन्य गावांमध्ये ये-जा करण्यासाठी करतात. त्यांना रहदारीसाठी या मार्गाला पर्यायी राेड नाही. प्रशासनाने या मार्गाच्या रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम हाती घेतले हाेते. मात्र, ते मध्येच बंद करण्यात आले. माैदा-काेदामेंढीपर्यंतच्या राेडच्या कामाला मंजुरी नसल्याने ते बंद करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागातील जाणकार व्यक्तींनी दिली.

राजोली, रेवराल, चारभा, पिपरी, सुंदरगाव, मांगली (तेली) येथील नागरिक रोज एनटीपीसीमध्ये कामाला, तसेच मौदा शहरातील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, सरकारी दवाखान्यात व इतर कामांसाठी याच रस्त्याने जातात. दरम्यान, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी या मार्गाचे रुंदीकरण व दर्जेदार डांबरीकरण करण्याची मागणी रेवरालचे सरपंच चिंतामण मदनकर, उपसरपंच महेंद्र बोरघरे, राजोलीच्या सरपंच मीना तांडेकर, उपसरपंच काशीनाथ पोटभरे यांच्यासह नागरिकांनी केली. या राेडवरील अपघाताची नैतिक जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गाेडबाेले यांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

...

राेडवरील खड्डे जिवावर उठले

या राेडवर सर्वत्र छाेटे-माेठे खड्डे तयार झाले आहेत. शिवाय, राेडच्या दाेन्ही बाजूंचे डांबरीकरण दबले गेले आहे. त्यामुळे हा राेड उंच सखल झाला आहे. रुंद व खाेल खड्डे, राेडवर विखुरलेली गिट्टी अपघातास कारणीभूत ठरत आहे. या राेडवर दुचाकी वाहने स्लीप हाेऊन अपघात हाेण्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये चारचाकी वाहने गेल्यास इंजिनचा भाग जमिनीला लागताे. त्यामुळे अपघातांसाेबत वाहनांचेही नुकसान हाेत असल्याने राेडवरील खड्डे वाहनचालकांच्या जिवावर उठले आहेत.

Web Title: When was the Revaral-Rajaeli-Kaedamendhi road repaired?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.