शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेमधील व्हीसीबी अचानक बंद पडते तेव्हा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 20:57 IST

एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली.

ठळक मुद्देमहामेट्रोची मॉक ड्रील : ४६ प्रवाशांना सुरक्षितपणे आणले स्टेशनवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली. लगेच व्हॅक्युम सर्किट ब्रेकर पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, मात्र ते सुरू होत नव्हते. याची तात्काळ माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. अशाप्रसंगी ४६ प्रवाशांना स्टेशनवर सुरक्षित आणण्यात आले. मंगळवारी घेतलेली महामेट्रोची मॉक ड्रील यशस्वी ठरली.घटनेचा तपशील जाणून घेताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसरे पँटोग्राफ उभारण्याचे व व्हॅक्युम सर्किट ब्रेकर बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर लगेच दुसरे पँटोग्राफ उभारण्यात आले, मात्र तरीही व्हॅक्युम सर्किट ब्रेकर बंद होत नव्हते. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली व प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्याची परवानगी घेतली.प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्याची घोषणा करण्याचे निर्देश ट्रेन ऑपरेटरला देण्यात आले. प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्याच्या आधी व्हायाडक्टवरचे लाईट सुरूकरण्यात आले. तसेच ट्रेन ऑपरेटरला आपातकालीन दार उघडण्याचे आदेश देत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर साऊथ एअरपोर्ट स्टेशनच्या कंट्रोलरला याची माहिती देण्यात आली. रेल्वेतून सर्व ४६ प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर सर्वांना साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनकडे जाण्याची सूचना दिली. दोन दिव्यांग नागरिकाला स्ट्रेचरवरून नेण्यात आले. शेवटी सर्व प्रवासी एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर आल्याची माहिती या स्टेशन कंट्रोलरने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. रिकामी रेल्वे डेपोला पाठविण्यात आली.प्रवासादरम्यान ट्रेन बंद पडल्यास प्रवाशांना पुढच्या स्टेशनवर सुरक्षित आणण्यासाठी कशा प्रकारच्या योजना कराव्यात, यासाठी मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण मॉक ड्रील यशस्वीरीत्या केवळ २० मिनिटात पूर्ण झाली. मॉक ड्रील पूर्ण झाल्याची सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.बुधवारपासून दर १५ मिनिटांनी मेट्रोमहामेट्रोतर्फे बुधवार, २७ नोव्हेंबरपासून वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी दरम्यान (रिच-१) ताशी ८० किमी वेगाने दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा नागरिकांना उपलब्ध देण्यात येत आहे. सध्या केवळ २५ मिनिटात नागरिकांना सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी इंटरचेंजदरम्यान प्रवास करता येत आहे. बुधवारपासून प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोNAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन