शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
2
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
3
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
4
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
5
भारतीय 'सबीह खान' यांची Apple मध्ये जादू! २३४ कोटींचे वार्षिक पॅकेज; कुठे झालंय शिक्षण?
6
भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
7
कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
8
२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले…
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना शुभ-फलदायी, पैशांचा ओघ राहील; ४ राशींना संघर्ष, संमिश्र काळ!
10
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
11
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
12
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
13
हिस्ट्री शीटर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात; अंगावर २५ गुन्हे असलेल्या सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून उमेदवारी
14
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
15
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
16
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
17
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
18
महापालिका रणांगणात मनसेची 'नवी फळी'; २६ उमेदवार कोट्यवधी संपत्तीचे मालक
19
पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
20
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी कधी सुटणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:20 IST

नागरिकांचा विकास कामांना विरोध नाही. परंतु वर्षभरापासून वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. यातून वाहनचालकांची सुटका होण्याची चिन्हे दिसत नाही. मेट्रोद्वारे तयार करण्यात येत असलेल्या डबल डेकर उड्डाणपुलाचे गर्डर टाकणे सुरू असल्याने रात्रीच्या वेळी छत्रपती चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान एकेरी वाहतूक बंद करण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : रात्रीला एकेरी वाहतुकीमुळे फेरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांचा विकास कामांना विरोध नाही. परंतु वर्षभरापासून वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. यातून वाहनचालकांची सुटका होण्याची चिन्हे दिसत नाही. मेट्रोद्वारे तयार करण्यात येत असलेल्या डबल डेकर उड्डाणपुलाचे गर्डर टाकणे सुरू असल्याने रात्रीच्या वेळी छत्रपती चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान एकेरी वाहतूक बंद करण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या मार्गावरील मेट्रो रेल्वे काम अंतिम टप्प्यात आहे. साईमंदिर ते विमानतळादरम्यान उड्डाणपुलावर दोन्ही बाजूने गर्डर टाकण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती चौक ते विमानतळापर्यंतच्या रस्त्यावरील एकेरी वाहतूक रात्री बंद करण्यात येते. वर्धा मार्गावरील वाहनांसाठी आता खामला ते सहकारनगर स्मशानघाटाजवळून विमानतळ परिसराच्या आतून पयांयी रस्ता दुरुस्त करून त्या ठिकाणाहून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे घाटापासून थेट विमानतळाच्या प्रवेशद्वारावर रस्ता निघतो. मात्र, विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता रात्री १० वाजेनंतर बंद करण्यात येतो. त्यामुळे वाहनांना वर्धा मार्गाशिवाय पर्याय राहात नाही. पण, रात्री या मार्गावर काम सुरू असल्याने कर्मचारी वाहतूक रोखून धरतात.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. तीन वर्षांपासून शहरात मेट्रो, सिमेंट रस्ते आणि उड्डाण पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे.रात्रीला अनेकजण अजनी चौकापासून खामला चौक, खामला बाजारकडून पर्यायी रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतात, पण रात्री रस्त्याचे प्रवेशद्वार विमानतळ सुरक्षा व्यवस्थेकडून बंद करण्यात येते. त्यामुळे अनेकांना परत छत्रपती चौकात यावे लागते. अन्यथा जयप्रकाशनगरच्या आतून उज्ज्वलनगर परिसरातून वर्धा मार्गावर यावे लागते. तर वर्धेकडून नागपूरच्या दिशेने येणारी अनेक वाहने रात्री विमानतळाच्या प्रवेशद्वाराने खामला बाजारकडे येण्याचा प्रयत्न करतात. पण, सहकारनगर घाटाजवळील प्रवेशद्वार बंद राहते व त्यांना पुन्हा यू-टर्न घेऊन तीन किमी मागे जावे लागते.सीताबडीतही अशीच स्थितीसीताबर्डी परिसरातही मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. महाराष्ट्र बँक चौकात चारही बाजूने खोदकाम व बांधकाम सुरू आहे. मेट्रो इमारतीच्या पिल्लरच्या खालून वाहतूक सुरू असून त्या ठिकाणी दिवसाही मोठा अंधार असतो. सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच मेट्रो पिल्लरमुळे झाशी राणी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सदर व भागातही सायंकाळी व सकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी निर्माण होते.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर