शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

३५० फुटाच्या बोअरवेलच्या खड्ड्यात तीन वर्षाचा बालक पडतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 10:09 AM

Nagpur News खड्ड्यात २० फुटावर अडकलेल्या नवधान देना दोंडा या मुलाला गावकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले.

ठळक मुद्दे-नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ३५० फुटाच्या बोअरवेलच्या खड्ड्यात एखादा बालक पडला आणि तो वाचला हे सांगितल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील! मात्र रामटेकपासून २० कि.मी. अंतरावरील शिवनी (भोंडकी) या गावात बुधवारी (दि. ९) दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे घडलय. खड्ड्यात २० फुटावर अडकलेल्या नवधान देना दोंडा या मुलाला गावकऱ्यांनी सुखरूप बाहेरही काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवनी (भोंडकी) येथील एका शेतात काठयावाडींनी डेरा टाकला आहे. या शेतात जवळपास ३५० फुटांची एक बोअरवेल आहे. पण पाणी न लागल्याने ती तशीच ठेवण्यात आली. तीन वर्षीय नवधान देना दोंडा हा इतर मुलांसोबत तिथे खेळत होता. खेळता खेळता तो बोअरवेलच्या खड्ड्यात पडला. तिथे उपस्थित त्याचे आई-वडील व इतर नातेवाईक धावले. गावातही ही बातमी वाऱ्यासारखी पोहोचली. ग्राम रक्षक दलाचे कृष्णा पाटील, यादोराव शेंडे, शंकर शेंडे, अक्षय गभणे घटनास्थळी दाखल झाले.

मुलांच्या नातेवाईकांनी बाहेरून त्याला आवाज दिला. यानंतर आत एक दोर सोडण्यात आला. बोअरवेलमध्ये पडला असताना मुलाच्या पायात शूज होते. तो थोडा लठ्ठ असल्याने खड्ड्यात २० फुटावर अडकला. त्यांच्या भाषेत आई-वडिलांनी त्याला आवाज दिला, त्यानेही प्रतिसाद दिला. त्याने सोडलेला दोर घट्ट पकडला. त्यानंतर त्याला हळूहळू वर ओढण्यात आले. नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. बाहेर आल्यावर त्याला पाणी पाजण्यात आले. सुदैवाने त्याला कोणतीही जखम झाली नसल्याने उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

टॅग्स :Accidentअपघात