शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

श्रीदेवी जेव्हा नागपूर जिल्ह्यातील काटोलला येते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 9:23 AM

मुझे गांव देखना हैं...असे म्हणत श्रीदेवीने ते निमंत्रण स्वीकारले आणि गावाच्या या ओढीत तिने काटोल गाठलेदेखील.

ठळक मुद्देमुझे गांव देखना है..काटोल येथील बक्षीस समारंभ आटोपल्यानंतर श्रीदेवी यांनी तेथे उपस्थित ग्रामीण महिलांशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या स्वत: चालत महिलांकडे गेल्या. त्यांच्याशी हिंदीतून हितगूज केले. त्यांच्या जीवनपद्धतीविषयी जाणून घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रीदेवी, राणी होती बॉलिवूडची. पैसा आणि प्रसिद्धीचा झगमगाट रात्रंदिवस अनुभवायची ती. पण, या झगमगाटाच्या पल्याड एक विरक्त कोपरा होता. जो दिसत नव्हता प्रेक्षकांना पडद्यावर. तो केवळ तिलाच जाणवायचा. या कोपऱ्यात ती, तिचे चौकोनी घर, जंगल, पहाड, नदी, गाव अन् मनशांतीची अनासक्त ओढ नांदायची. म्हणूनच नागपूरजवळच्या काटोलसारख्या छोट्या गावचे निमंत्रण मिळाले तेव्हा नकारासाठी तिच्याकडे कारणच नव्हते.मुझे गांव देखना हैं...असे म्हणत श्रीदेवीने ते निमंत्रण स्वीकारले आणि गावाच्या या ओढीत तिने काटोल गाठलेदेखील. आख्यायिका ठरावी इतकी प्रसिद्धी लाभलेली ही देखणी अन् हसरी अभिनेत्री काल हे जग सोडून गेली आणि तिच्या नागपूर-काटोल भेटीच्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. ही आठवण २००४ ची आहे. त्यांना ग्रामीण महिलांची मराठी नीट कळत नव्हती. पण, त्या महिलांच्या डोळ्यातील भाव त्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत होत्या, हा किस्साही अनिल देशमुखांनी आवर्जून सांगितला.जेवण साधेच हवेश्रीदेवी ही मोठी अभिनेत्री आहे. तिच्या आदरातिथ्यात काही कमी राहू नये म्हणून देशमुख कुटुंबाने जय्यत तयारी केली होती. मांसाहारी व शाकाहारी दोन्ही प्रकारच्या व्यंजनाचा बेत होता. श्रीदेवी प्रत्यक्ष जेवायला बसल्या तेव्हा काय वाढायचे त्यांना विचारण्यात आले. परंतु त्यांनी पोळी, वरण, भात आणि भाजी असे साधे जेवण मागितले. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाशी त्या खूपच जिव्हाळ्याने बोलल्या. तेव्हा प्रचंड स्टारडम लाभलेल्या या अभिनेत्रीच्या आतील एका साध्या स्त्रीचा अनुभव मला आला, अशा शब्दात माजी मंत्री अनिल देशमुख यांनी श्रीदेवींच्या नागपूर भेटीची आठवण सांगितली.त्यावेळी काटोल येथे विदर्भ यूथच्या अनुप खराडे यांनी महिलांची अखिल भारतीय खो-खो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला श्रीदेवी यांनी यावे, असे त्यांना वाटत होते. राज्य सरकारमधील तत्कालीन मंत्री अनिल देशमुख यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. याआधी ते चारपाचदा श्रीदेवींशी भेटले होते. त्यामुळे परिचय होताच. त्यांनी श्रीदेवींना याबाबत विचारले आणि गाव जवळून बघायला मिळणार या आनंदाने तिने हे निमंत्रण स्वीकारले. या निमित्ताने ती पहिल्यांदा नागपुरात आली. काटोलला रवाना होण्याआधी अनिल देशमुखांच्या बंगल्यावर थांबली. हे त्यांच्या चाहत्यांना कळताच श्रीदेवींची एक झलक पाहायसाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. ज्यांनी त्यावेळेस या आरस्पानी सौंदर्यवतीला पाहिले होते त्या नागपूरकरांना तिच्या अशा अकाली जाण्याने मोठा धक्का बसला.

टॅग्स :bollywoodबॉलिवूड