शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

...जेव्हा नाती रक्तरंजित होतात! अलीकडच्या काळात रक्तांच्या नात्यांमध्ये होणाऱ्या हत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:57 IST

Nagpur : यवतमाळ शहरालगत पिंपळगाव बायपासवर मोठ्या भावाचा लहान भावाने लोखंडी रॉडने मारहाण करून केलेला खून, गडचिरोलीत वडिलांची हत्या करून मुलाने मित्राच्या मदतीने वडिलांच्या मृतदेहाची जंगलात लावलेली विल्हेवाट तसेच गोंदियात कौटुंबिक वादातून वडिलानेच केलेला मुलाचा खून.

राजेश शेगोकारनागपूर : नातं हे केवळ रक्ताचेच नसते, तर प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे असतं. जेव्हा या तिन्ही गोष्टी हरवतात, तेव्हा नातं फक्त नावापुरते उरतं, त्यामधूनच मग वाद, विसंवाद, हेवेदावे होतात अन् त्याची परिसीमा गाठली की रक्ताची नातीसुद्धा रक्तरंजित होतात. यवतमाळ शहरालगत पिंपळगाव बायपासवर मोठ्या भावाचा लहान भावाने लोखंडी रॉडने मारहाण करून केलेला खून, गडचिरोलीत वडिलांची हत्या करून मुलाने मित्राच्या मदतीने वडिलांच्या मृतदेहाची जंगलात लावलेली विल्हेवाट तसेच गोंदियात कौटुंबिक वादातून वडिलानेच केलेला मुलाचा खून. गेल्या आठवड्यातील या ठळक घटना, अलीकडच्या काळात रक्तांच्या नात्यांमध्ये होणाऱ्या अशा हत्यांचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आहे. मायेचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा किल्ला मानल्या जाणाऱ्या घरात रक्ताच्याच नव्हे तर इतर नात्यातही गोडवा होता; पण आताच्या काळात त्याच घरातली सख्खी नाती एकमेकांचे जीव घेताना दिसत आहेत. ही केवळ गुन्हेगारी घटना नाही, तर एका सामाजिक अधःपतनाचं स्पष्ट लक्षण आहे.

बदलत्या काळातील धकाधकीच्या जीवनशैलीमुळे नात्यांमध्ये संवाद कमी झाला आहे. पूर्वी जिथे एकत्र कुटुंबात एकमेकांचा आधार होता, तिथे आता विभक्त कुटुंबात माणसं एकटी पडत चालली आहेत. मोबाइल, सोशल मीडिया आणि टीव्हीवरच्या नात्यांचं अतिरंजित नाटकीकरण यामुळे खरी नाती फक्त नावापुरती उरली आहेत. संवादाच्या जागी मेसेज आणि सहवासाच्या जागी स्क्रीन आली आहे. जवळ असूनही अंतर वाढलं आहे. ताणतणाव वाढले आहेत. त्यामुळे मनातली खदखद बाहेर येण्याऐवजी आतच साठते आणि तीच एका क्षणी हिंसक रूप घेत असल्याचं दिसतं. 

काही घटनांमागे पैशासाठी, संपत्तीच्या वादासाठी किंवा स्वार्थासाठी नात्यांचा बळी दिला जातो तर काही हत्यांमागे वाढती व्यसनाधीनता व ती पूर्ण करण्याकरिता असणारी पैशांची गरज दिसत आहे. काहींना वाढत्या अपेक्षांची पूर्तता करण्यात येणारे अपयश, स्पर्धेची भीती, विश्वासघात अशा अनेक कारणांमधून मग अनेकांना तणाव, नैराश्य, रागावर नियंत्रण न राहणं, अशा समस्या उद्भवतात ज्याचा उद्रेक कधी-कधी हिंसक होतो. त्यामुळे मानसिक आरोग्य हेही यामागचं एक महत्त्वाचं कारण समोर येत आहे. अशा वेळी हा प्रश्न केवळ व्यक्तीचा न राहता कौटुंबिक व सामाजिक होतो. अशा हिंसक प्रवृत्तीच्या कारणांची उत्तरे पोलिसांत किंवा कोर्टात पूर्णपणे मिळणार नाहीत तर त्याचा शोध घरातून सुरू व्हायला हवा. समुपदेशन, संवाद, सहनशीलता या उपचारांमध्ये आपलेपणाची ओल टिकवून ठेवायला हवी, त्यामुळे आज सर्वाधिक गरज आहे ती नात्यांना घट्ट पकडून ठेवण्याची, संवाद साधण्याची आणि रागाच्या क्षणी थांबून विचार करण्याची. 

नाती कमावणे सोपं आहे; पण ती जपणं ही खरी कला आहे. प्रेम, विश्वास आणि संवादाची नाळ तुटली की, रक्ताची नातीसुद्धा रक्तरंजित होतात. समाज म्हणून आपण जर वेळेवर सावध झालो नाही, तर उद्याचं चित्र अजून भयावह असेल. घराचे दरवाजे बंद करणे सोपे असते; पण मनाचा दरवाजा उघडा ठेवणं फार महत्त्वाचं आहे, तो जोवर उघडा राहील तोवर अनेक प्रेमाची नाती प्रवेश करतील, आनंद देतील त्यामुळे तो दरवाजा बंद होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.. फक्त दरवाजा दोन्ही बाजूंनी उघडणारा असावा! 

टॅग्स :nagpurनागपूर