सहदिवाणी न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST2021-06-09T04:11:11+5:302021-06-09T04:11:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : येथे सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुमारे चार वर्षांपासून न्यायाधीश पद ...

सहदिवाणी न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती कधी?
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : येथे सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुमारे चार वर्षांपासून न्यायाधीश पद रिक्त आहे. या कारणामुळे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायालयावर अतिरिक्त भार पडतो. शिवाय नागरिकांनाही अनेक प्रकरणांमध्ये ‘तारीख पे तारीख’चा सामना करावा लागत आहे. सहदिवाणी न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती कधी होणार, असा सवाल नागरिकांचा आहे.
उमरेड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी या न्यायालयांमार्फत न्यायदानाचे कार्य चालते. बेला आणि उमरेड पोलीस ठाणे तसेच सिव्हिल प्रकरणे याठिकाणी चालतात. सहदिवाणी न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित असून, याठिकाणी तातडीने न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.