शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राजीनामे कधी देता ? नागपूर शहर भाजपा कार्यालयातील शिपायाचे नगरसेवकांना फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:53 IST

शिस्त व परंपरेच्या नावावर भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने राजीनामे मागितले जात आहे ते आमच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यासारखे आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची प्रचंड नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिस्त व परंपरेच्या नावावर भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने राजीनामे मागितले जात आहे ते आमच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यासारखे आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ज्या नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामे सोपविले नाही त्यांना सत्तापक्ष कार्यालयातील शिपायाकडून राजीनामे आणून देण्यासाठी फोन केले जात आहेत.नगरसेवकांचे राजीनामे मागण्याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या तीन टर्म पासून नागपूर महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. प्रत्येक वेळी निवडणूक जिंकल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली जायची. या नोंदणासाठी जाण्यापूर्वी नगरसेवकांकडून राजीनामा पत्रही लिहून घेतले जायचे. हा पक्षशिस्तीचा भाग होता. ही एक परंपरा असून यात चुकीचे काहीच नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे. मात्र, पहिल्यांदाच भाजपाचे नगरसेवक म्हणून महापालिकेत पोहचलेल्या नगरसेवकांमध्ये राजीनामा मागण्यावरून नाराजी आहे. अनेकांनी इच्छा नसतानाही राजीनामे लिहून दिले आहेत. काही वरिष्ठ नगरसेवक विविध कारणांनी अद्याप राजीनामे देऊ शकले नाहीत. राजीनामा पक्षाकडे सादर करायचा आहे. मात्र, त्यांना महापालिकेतील सत्तापक्ष कार्यालयातून शिपायाचे फोन जात असून राजीनामा आणून देण्याच्या सूचना दिल्या जात आहे. यामुळे नगरसेवक नाराज आहेत. आम्ही पक्षाकडे राजीनामा देणारच आहोत. मात्र, असे शिपायाकडून फोन करून राजीनाम्याची विचारणा करणे अपमानास्पद वाटत आहे. शिपायाला तसा अधिकार आहे का, पक्षाचा आमच्यावर विश्वास राहिला नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे एका ज्येष्ठ नगरसेवकाने बोलून दाखविले.भाजपाचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. याशिवाय ४ स्वीकृत नगरसेवक आहेत. प्राप्त माहितीनुसार सुमारे १० नगरसेवकांनी अद्यापही राजीनामे सादर केलेले नाहीत. यात काही ज्येष्ठ नगरसेवकांचाही समावेश आहे. गेल्या कार्यकाळात भाजपाच्या काही नगरसेवकांनी शेवटपर्यंत राजीनामे सादर केले नव्हते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई देखील झाली नव्हती. मात्र, निवडणुकीत यातील काहींचे तिकीट कटल्याचे पहायला मिळाले होते.चार नगरसेवकांचे पत्र मिळायचे आहे : जोशीसत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सांगितले की, भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे घेण्याची पक्षाची परंपरा आहे. यावेळी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करताना राजीनामे लिहून घ्यायचे विसरून गेले. स्थायी समितीमधील अर्धे सदस्य सेवानिवृत्त होतात.मात्र, त्यांच्यासोबत उर्वरित सदस्य देखील समितीचा राजीनामा देतात. मात्र, यावेळी राजीनामे घेण्यात आले नव्हते. त्यामुळे २४ जानेवारी रोजी आयोजित पक्षाच्या बैठकीत नगरसेवकांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले होते. ज्यांनी सादर केले नाही त्यांना कार्यालयातून फोन करण्यात आले असतील. फक्त चार नगरसेवकांचे पत्र येणे बाकी आहे. या प्रक्रियेला एकाही नगरसेवकाने विरोध केलेला नाही, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर