डीजेवाले बाबू भीक मागतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 01:24 IST2017-08-20T01:23:49+5:302017-08-20T01:24:07+5:30

नागपुरात डीजेवाले बाबू गाना बजाव असे म्हटले तर यापुढे डीजेवाले गाणे वाजविणार नाहीत. कारण शासनाने त्यांच्या व्यवसायावरच बंदी आणली आहे.

 When the dijewale babu asks alms ... | डीजेवाले बाबू भीक मागतात तेव्हा...

डीजेवाले बाबू भीक मागतात तेव्हा...

ठळक मुद्देव्यवसायावर बंदी : सरकारचे लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात डीजेवाले बाबू गाना बजाव असे म्हटले तर यापुढे डीजेवाले गाणे वाजविणार नाहीत. कारण शासनाने त्यांच्या व्यवसायावरच बंदी आणली आहे. त्यामुळे बेरोजगार झालेल्या डीजे व्यावसायिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन केले. भीक मागून जमविलेला निधी उपजिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री निधीत गोळा करण्यात आला.
सरकारने डीजे व्यावसायिकांवर बंदी आणल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध शहरातील शेकडो डीजे व्यावसायिकांनी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन केले. आंदोलकांनी झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, संविधान चौक या मार्गाने भव्य मोर्चा काढून दुचाकी, चारचाकी वाहनचालक, फुटपाथ दुकानदारांना भीक मागितली. यावेळी शासनाच्या विरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. डीजेवर बंदी घातल्यामुळे गणेशोत्सव, दुर्गोत्सव, लग्नसमारंभ, वाढदिवस आदी उत्सवावर विरजण पडल्याची भावना संतप्त आंदोलकांनी व्यक्त केली. संविधान चौकात आमदार प्रकाश गजभिये यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात गोरगरीब जनतेला व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करण्यात कुठलीच अडचण येत नव्हती. परंतु विद्यमान सरकारच्या काळात व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. भीक मांगो आंदोलनातून एकूण ४,१४७ रुपये गोळा करण्यात आले. हा निधी विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री निधीत गोळा करण्यासाठी आंदोलक गेले असता, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निधी गोळा करण्याची सूचना केली. त्यावर उपजिल्हाधिकारी पडोळे यांच्यामार्फत हा निधी मुख्यमंत्री निधीत गोळा करण्यात आला. आंदोलनात शहरातील जवळपास ५०० डीजे व्यावसायिकांसह विदर्भ बॅक स्टेज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बारस्कर, पम्मी भत्ती, राष्ट्रवादी काँंग्रेसचे विजय गजभिये, अमोल मौंदेकर, निखील कामडे, रविकांत पवनीपगार, विनायक मानकर, नितीन अन्नपूर्णे, दलजित शाह, अभिजित वाळके, रोशन बिरहा, वैभव शेंडे, दीपक नितनवरे, रोशन गिरी, प्रवीण बोकडे, नीतेश मानकर, मदन पाटील, दिनेश वानखेडे, राकेश राऊत, रामू नायडू आदी सहभागी झाले होते.

Web Title:  When the dijewale babu asks alms ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.