व्हॉटस् अ‍ॅपने लावले भांडण

By Admin | Updated: September 21, 2014 01:13 IST2014-09-21T01:13:39+5:302014-09-21T01:13:39+5:30

व्हॉटस् अ‍ॅपवरून चॅटिंग करताना एकाने दुसऱ्याला अश्लील शिव्या दिल्या. त्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान प्राणघातक हल्ल्यात झाले. तिघांनी एकावर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले.

The Whatsapp app took the quarrel | व्हॉटस् अ‍ॅपने लावले भांडण

व्हॉटस् अ‍ॅपने लावले भांडण

प्राणघातक हल्ला : एक गंभीर
नागपूर : व्हॉटस् अ‍ॅपवरून चॅटिंग करताना एकाने दुसऱ्याला अश्लील शिव्या दिल्या. त्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान प्राणघातक हल्ल्यात झाले. तिघांनी एकावर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. शुक्रवारी रात्री ११ वाजता खामल्यात ही घटना घडली. दीपक भावनदास हेमदानी (वय २५) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो खामल्यातील सिंधी कॉलनीत राहतो. त्याचे संतोष, शुभम आणि दीपू चेतवानीसोबत मोबाईलवर चॅटिंग करताना आॅनलाईन भांडण झाले. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी रात्री ११ वाजता दीपक हेमदानी तसेच संतोष, शुभम आणि दीपू हे प्रतापनगरातील न्यू ग्रॅण्ड बारच्या समोर एकमेकांना दिसले. तेथे चेतवानी बंधूंनी दीपकला बेदम मारहाण केली. तो आपल्या घरी पळून आला असता आरोपी त्याच्या मागे आले. तेथेही त्याला रॉडने मारहाण केली. या मारहाणीत दीपक जबर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी चेतवानी बंधूविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)

Web Title: The Whatsapp app took the quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.