शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

"चार्टर्ड फ्लाईटने बोलविले अन ठोकून दिले तर काय करता ?" बच्चू कडूंची मुंबईत न जाण्याची भूमिका कायम

By योगेश पांडे | Updated: October 29, 2025 17:39 IST

जनता वेठीस, मात्र कडूंचे वेगळेच बोल : जर पोलिसांनी आमची वाहने अडविली तर वेगळा विचार करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे नागरिक अक्षरश: वेठीस धरले गेले आहेत. हे आंदोलन थांबविण्यात यावे यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील कडू यांना विनंती केली. मात्र कडू यांनी मुंबईत चर्चेसाठी जाणार नाही, सरकारच्या मंत्र्यांनी नागपुरात येऊन चर्चा करावी अशी भूमिका घेतली. त्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी कायम होती.

नागपूरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे सरकार आणि आंदोलकांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. सरकारी अधिकारी तसेच काही मंत्र्यांनी कडू यांना फोन लावला. मात्र कडू यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. अखेर गिरीश महाजन यांचा फोन त्यांनी उचलला. आंदोलन सोडून चर्चेसाठी मुंबईला येणार नाही, अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी मांडली. मुंबईला येण्याजाण्यात एक दिवस जाईल. त्या कालावधीत इथे आंदोलकांसोबत दगाफटका होण्याची भिती आहे. जी चर्चा आहे ती नागपुरातच व्हावी. अनेक विषयांची तर मुख्यमंत्र्यांशी अगोदरच चर्चा झाली आहे. केवळ शासन निर्णय जारी करायचे आहेत. असे कडू म्हणाले.

चंद्रपूरमध्ये नागपुरच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांची वाहने अडविण्यात आल्याची माहिती आली आहे. जर ही वाहने सोडली नाही तर आम्हाला आंदोलन वेगळ्या दिशेने नेण्याबाबत विचार करावा लागेल असा इशारा कडू यांनी दिला. या आंदोलनामुळे लोक वेठीस धरले गेले आहे. याबाबत कडू यांना विचारणा केली असता लोकांना वेठीस धरण्याची आमची मानसिकता नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

चार्टर्ड फ्लाईटने बोलविले अन ठोकून दिले तर काय करता ?

काहीही झाले तरी आम्ही आंदोलन थांबवू शकत नाही. बाकी आंदोलनात ऑन द स्पॉट निर्णय घेतला गेला. मात्र आम्हाला मुंबईला बोलविण्याचा आग्रह संशयास्पद आहे. आम्हाला चार्टर्ड फ्लाईटने बोलविले आणि ठोकून दिले तर काय करता असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bachchu Kadu Refuses Mumbai Visit: Fears Deception Amid Farmer Protest

Web Summary : Bachchu Kadu refuses to halt farmer protests, demanding discussions in Nagpur. He suspects foul play if lured to Mumbai via chartered flight. Traffic disruption continues as government intervention stalls.
टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूnagpurनागपूरFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीMumbaiमुंबईBacchu Kaduबच्चू कडू