बेशिस्त पार्किंगचे काय ?

By Admin | Updated: November 7, 2014 00:42 IST2014-11-07T00:42:12+5:302014-11-07T00:42:12+5:30

शहरात रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये होत असलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत. मनात येईल तेथे गाडी पार्क केल्यामुळे रस्ते रुंद होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

What is the purpose of parking? | बेशिस्त पार्किंगचे काय ?

बेशिस्त पार्किंगचे काय ?

नागरिक त्रस्त : न्यायालयाचे आदेश तरीही...
नागपूर : शहरात रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये होत असलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत. मनात येईल तेथे गाडी पार्क केल्यामुळे रस्ते रुंद होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये मोठमोठे मॉल्स, रुग्णालये, हॉटेल आहेत. मात्र या इमारती बांधताना अनेक ठिकाणी पार्किंगच्या सुविधेचा नियम पाळण्यात आला नाही. परिणामी या भागातील रहिवाशांवर अनधिकृत पार्किग माथी मारली जात आहे. अशा गर्दीच्या ठिकाणावरून गाड्या चालविताना नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
ही तर तारेवरची कसरत
मध्यवर्ती भागातील रहदारीच्या ठिकाणी गाड्यांची पार्किंग सर्वात मोठी डोकेदुखी आहे. रोजचे काम सोडून वाहन पार्किंगसाठी जागा शोधत फिरावे लागते. व्हेरायटी चौकातील इंटरनिटी मॉलला लागून एनआयटीचे वाहनतळ आहे. मात्र तिथे गाड्या लावणे मोठे कसरतीचे काम आहे.
चहाच्या ठेल्यांचा कब्जा
धंतोली परिसरातील अनेक रहदारीच्या ठिकाणी मनपाने वाहनांच्या पार्किंगसाठी जागा सोडली होती. मात्र त्यातील बहुतांश जागांवर चहाच्या ठेलाचालकांनी कब्जा मिळविला आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत या ठेल्यांवर ग्राहकांची जत्रा भरते. परिणामी या भागातील वाहनतळ सर्वात गंभीर समस्या आहे.
भंगार व्यावसायिक मुजोर
सीताबर्डी हा नागपुरातील सर्वात गजबजलेला बाजार आहे. या भागात मनपा आणि नागपूर सुधार प्रन्यासने पे अ‍ॅण्ड पार्कची व्यवस्था केली होती. प्रत्यक्षात त्याचा धिंगाणा झाला आहे. नागरिक मनाला वाट्टेल तिथे गाड्या पार्क करतात. जिथे थोडीफार जागा होती, तिथे भंगार दुकानदारांनी ताबा मिळविला आहे. तिथे गाड्या पार्क केल्या तर मुजोर झालेले हे व्यावसायिक गाड्या पंक्चर करतात.
जागेची मारामार
सीताबर्डी भागात वाहनांच्या पार्किंगची समस्या सर्वात भीषण आहे. काम पाच मिनिटांचे असते; मात्र गाडी पार्क करण्यासाठी तासन्तास शोधाशोध करावी लागते. हायकोर्टाने पुस्तक बाजाराच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेश देऊनही, तो बाजार अद्याप हटविण्यात आलेला नाही.

Web Title: What is the purpose of parking?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.