शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विदर्भात अधिवेशन घेऊन काय साधले ?, धनंजय मुंडे यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 22:18 IST

अंतिम आठवडा प्रस्तावादम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी

नागपूर : विदर्भात अधिवेशन असताना शेतकऱ्यांबाबत सरकारने उदासीन भूमिकाच घेतली. प्रत्यक्षात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यात अडचणी येत आहेत. विदर्भात अधिवेशन असतानादेखील सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. येथे अधिवेशन घेऊन सरकारने के साधले, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. गुरुवारी त्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शासनावर जोरदार टीका केली.शेतकऱ्यांना किती टक्के पिक कर्ज मिळाले हे सरकारने जाहीर करावे. पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करण्याइतपत अधिकाऱ्यांची हिंमत झाली. याला शासनाची भूमिकाच कारणीभूत आहे. राज्यातील शेतक-याला पीकविमा मिळत नाही. मात्र पीकविमा कंपनीच्या मालकांना 15 कोटी रुपये पगार मिळतो. सरकारचा कर थकविणाऱ्या रिलायन्स कंपनीवर कारवाईची हिंमत सरकार दाखवणार का असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.  विदर्भातील सिंचन अनुशेष कायम आहे. न्यायालयात हमी दिलेले विदर्भातील 45 प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत.अनेक धरणात पाणी आहे परंतु कालवे-उपकालवे नाहीत. सरकारने मागील चार वर्षांत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केलेली नाही. समृद्धी आणि बुलेट ट्रेन प्रकल्पातच सरकार धन्यता मानत आहे, असेदेखील मुंडे म्हणाले. माणिकराव ठाकरे यांनीदेखील सरकारच्या धोरणांवर टीका केली. विदर्भाला सरकारने काहीच दिले नाही असे त्यांनी प्रतिपादन केले.

शिवसेनेने काय केले ?यावेळी मुंडे यांनी शिवसेनेवर देखील टीकास्त्र सोडले. कर्जमाफीचे राज्यभर ऑडिट करू असे सेनेतर्फे सांगण्यात आले होते. सत्तेत असताना अशा ऑडिटची वेळ येते हेच दुर्दैवी आहे. सेनेने नेमके किती ऑडिट केले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 मुंबईचा विकास आराखडा बिल्डरांसाठीमुंबईचा विकास आराखडा म्हणजे 'बिल्डरो का विकास, बीजेपी के पक्षनिधी के साथ' असा प्रकार असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. चार राज्यांच्या निवडणुकी लक्षात घेऊन हा आराखडा प्रलंबित ठेवला आहे. या आराखड्यामुळे मुंबईवरील भर वाढणार आहे. शिवाय या आराखड्यातुन शिवसेनेचे पंख छाटण्याचा प्रयत्न भाजपाने केल्याचा टोला त्यांनी लगावला.  डिजिटल यंत्रणेच्या सल्ल्यासाठी मुंबईमध्ये आयआयटी पवईसारखी जगविख्यात संस्था असताना तांत्रिक सल्लागार ओरिसा राज्यातून आयात का करण्यात आला असा सवालही मुंडे यांनी सरकारला विचारला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८