शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हेटरनरी कौन्सिल’ला कुठल्या मुहूर्ताची प्रतीक्षा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:17 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘माफसू’तर्फेदेखील (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) सर्व उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु आता पुढे काय करायचे याबाबत विद्यापीठ प्रशासनामध्येदेखील कुणाकडेच उत्तर नाही.

ठळक मुद्दे‘माफसू’च्या परीक्षांबाबत संभ्रम कायम हजारो विद्यार्थ्यांसमोर प्रश्न, अद्यापही दिशानिर्देश नाहीत

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘माफसू’तर्फेदेखील (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) सर्व उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु आता पुढे काय करायचे याबाबत विद्यापीठ प्रशासनामध्येदेखील कुणाकडेच उत्तर नाही.‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या किमान मापदंडांवर आधारित आहे. त्यामुळे परीक्षा प्रणालीत बदल करण्यासाठी परिषदेतर्फे सुधारित दिशानिर्देश जारी झाल्याशिवाय पुढील पावले उचलता येणार नाही. यासंदर्भात देशभरातील विविध विद्यापीठांनी परिषदेला पत्र लिहिले आहे. मात्र अद्यापही दिशानिर्देश जारी करण्यात आलेले नाही.अशा स्थितीत विद्यार्थ्यांमधील संभ्रम आणखी वाढला असून भारतीय पशुवैद्यक परिषदेला कुठल्या मुहूर्ताची प्रतीक्षा आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.सर्वसाधारणत: ‘डेअरी टेक्नॉलॉजी’, ‘फिशरी सायन्स’च्या सत्र प्रणाली व ‘व्हेटरनरी सायन्स’च्या वार्षिक प्रणालीच्या परीक्षा जून ते ऑगस्ट या कालावधीत चालतात. लॉकडाऊनमुळे विद्यापीठाने सर्व परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांकडूनदेखील सातत्याने विचारणाकेवळ विद्यापीठच नव्हे तर विद्यार्थ्यांकडूनदेखील ई-मेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय पशुवैद्यक परिषदेला विचारणा करण्यात येत आहे. परिषदेने लवकरात लवकर नवीन दिशानिर्देश जारी करावेत, अंतिम वर्ष सोडून इतर सर्व वर्षांच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, या दोन मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांकडून दिशानिर्देशांचीच प्रतीक्षायासंदर्भात पशुवैद्यकीयशास्त्र अधिष्ठाता व ‘डायरेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन्स’ डॉ.ए.पी.सोमकुंवर यांना विचारणा केली असता विद्यापीठाकडून भारतीय पशुवैद्यक परिषदेला पत्रव्यवहार झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत नवीन दिशानिर्देश येत नाहीत, तोपर्यंत आम्ही काहीच करु शकत नाही. मागील आठवड्यातच नवीन दिशानिर्देश अपेक्षित होते, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थी