परीक्षा शुल्काचे करता काय?
By Admin | Updated: March 27, 2015 02:04 IST2015-03-27T02:04:33+5:302015-03-27T02:04:33+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे वसूल करण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काची रक्कम नेमकी कुठे वापरण्यात येते, असा सवाल करून विधीसभा सदस्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

परीक्षा शुल्काचे करता काय?
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे वसूल करण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काची रक्कम नेमकी कुठे वापरण्यात येते, असा सवाल करून विधीसभा सदस्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ही कोट्यवधींची रक्कम विद्यार्थ्यांच्या योजनांवर खर्च करण्यात येत नसल्याचा आरोपदेखील यावेळी करण्यात आला. विधीसभेची बैठक याच मुद्यावरून जास्त गाजली.
विधीसभा सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. गेल्या पाच वर्षात वसूल करण्यात आलेला निधी व त्याच्या खर्चाबाबत विचारणा केली. परीक्षा शुल्कातून विद्यापीठाला सर्वात जास्त निधी मिळतो. परंतु विद्यार्थ्यांकडून येणारा हा निधी त्यांच्यासाठी हवा त्या प्रमाणात का वापरला जात नाही, असा प्रश्न येवले यांनी करताच प्रशासनातील अधिकारी चपापले.
शिवाय प्रत्येकवेळी परीक्षेऐवजी इतर कामांसाठी यातील निधी खर्च करण्यात आला. मात्र खर्चिक निधीतून अद्यापही परीक्षा पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. विद्यार्थी विद्यापीठाचा केंद्रबिंदू असताना, परीक्षा विभागावर प्रत्येकवेळी वसूल रकमेच्या २५ ते ३० टक्केच निधी खर्च करण्यात आला ही बाब डॉ. प्रमोद येवले यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. (प्रतिनिधी)