माकड दुसरे काय बोलणार ? - रावसाहेब दानवे

By Admin | Updated: February 5, 2015 16:43 IST2015-02-05T16:21:38+5:302015-02-05T16:43:59+5:30

माकडाच्या तोंडूंन दुसरे काय निघणार, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ओवेसींना लगावला आहे. मुस्लीम आरक्षणासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असे उद्गार काढले

What else will Monkey say? - Raosaheb Danwei | माकड दुसरे काय बोलणार ? - रावसाहेब दानवे

माकड दुसरे काय बोलणार ? - रावसाहेब दानवे

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ५ - माकडाच्या तोंडूंन दुसरे काय निघणार, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ओवेसींना लगावला आहे. मुस्लीम आरक्षणासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असे उद्गार काढले आहेत.
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी पुण्यात घेतलेल्या सभेत भाजपावर मुस्लीम आरक्षणावरून घणाघाती टीका केली होती. भाजपावर झालेल्या टीकांसदर्भात दानवे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी माकड दुसरे काय बोलणार, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, अशी अनेक माकडं आम्ही बघितली असून त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे आम्हाला चांगले माहीत आहे, असेही जानवे म्हणाले. पुण्यातील सभेत ओवेसींनी मुस्लीम समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला असल्याचे उदाहरण देताना माकडाची गोष्ट सांगितली होती. न्यायालय व अनेक आयोगांच्या अहवालात मुस्लीम वर्ग मागास असल्याचे स्पष्ट झाले असताना आम्हाल वेगळा न्याय दिला जातो. सबका साथ सबका विकास असा नारा देताना मुसलमान वेगळे का, असे म्हणत त्यांनी मुस्लीमांना आरक्षण देण्याबाबत वक्तव्य केले. त्याचबरोबर इतर मागास वर्ग आणि मराठा आरक्षणाचेही ओवेसींनी समर्थन केले होते. ओवेसींच्या याच वक्तव्याला धरून दानवे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ओवेसींना नाव न घेता टोला हाणला. 
 

Web Title: What else will Monkey say? - Raosaheb Danwei

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.