क्या ‘कर’ दिखाया ? :
By Admin | Updated: November 14, 2016 02:40 IST2016-11-14T02:40:11+5:302016-11-14T02:40:11+5:30
५०० आणि १०००च्या नोटा चलनातून बंद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे स्वागत देशभरातील प्रामाणिक नागरिकांनी केले.

क्या ‘कर’ दिखाया ? :
क्या ‘कर’ दिखाया ? : ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून बंद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे स्वागत देशभरातील प्रामाणिक नागरिकांनी केले. लवकरच बँकांचे व्यवहार सुरळीत होतील, अशी ग्वाही सरकारच्या वतीने देण्यात आली. सामान्यांची ताकद असल्यानेच आपण हा निर्णय घेतला असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. मात्र पाच दिवसापासून नोटा बदलवण्यासाठी बँकांमध्ये असलेल्या रांगा वाढतच आहेत. मोदींच्या निर्णयामुळे बनावट नोटा आणि काळ््या धनाला चाप बसेलच. मात्र आपल्या एका मतामुळे आज रांगेत उभे राहण्याची पाळी आली आहे, कदाचित उद्याचा बदल वेगळा असेल, अशा प्रतिक्रिया बजाजनगर चौकातील हा फलक पाहून नागपूरकर ‘मिश्कील’पणे व्यक्त करीत आहेत.