नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर काय कारवाई केली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:46 IST2021-02-05T04:46:24+5:302021-02-05T04:46:24+5:30

नागपूर : नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली, किती जणांवर कारवाई करण्यात आली, नायलॉन मांजाचा वापर थांबविण्यासाठी कोणत्या ...

What action was taken against those who used nylon cats? | नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर काय कारवाई केली?

नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर काय कारवाई केली?

नागपूर : नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली, किती जणांवर कारवाई करण्यात आली, नायलॉन मांजाचा वापर थांबविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, यासह इतर संबंधित मुद्यांवर येत्या बुधवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकार व महानगरपालिकेला दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नायलॉन मांजामुळे घडलेल्या प्राणघातक घटना आणि गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, उच्च न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. देवेंद्र चव्हाण यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रणय प्रकाश ठाकरे (२१) या तरुणाचा इमामवाडा परिसरात नायलॉन मांजाने गळा कापून वेदनादायी मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच मानेवाडा येथे सौरभ पाटणकर (२२) हा तरुण नायलॉन मांजाने गळा कापण्यापासून थोडक्यात बचावला. डिसेंबरमध्ये झिंगाबाई टाकळी येथे एका तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरला गेला. यावर्षी अशा अनेक घटना घडल्या. याशिवाय नायलॉन मांजा पशुपक्ष्यांसाठीही घातक ठरत आहे. नायलॉन मांजामुळे असंख्य पक्षी मृत्यूमुखी पडले व गंभीर जखमी झाले आहेत. राज्यात नायलॉन मांजा खरेदी-विक्री व वापरावर बंदी आहे. परंतु, काही व्यापारी पैशाच्या लालसेपोटी लपूनछपून नायलॉन मांजाची विक्री करतात. त्यामुळे शहरात नायलॉन मांजाची खरेदी-विक्री व वापर जोरात सुरू आहे.

Web Title: What action was taken against those who used nylon cats?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.