तर भिवापूरात ‘मिशन लसीकरण’बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:09 IST2021-04-10T04:09:01+5:302021-04-10T04:09:01+5:30

भिवापूर : कोरोना प्रतिबंधीत लसीचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे शिल्लक २०० डोजच्या बळावर शुक्रवारी भिवापूर व नांद केंद्रावर ...

What about 'Mission Vaccination' in Bhivapur? | तर भिवापूरात ‘मिशन लसीकरण’बंद?

तर भिवापूरात ‘मिशन लसीकरण’बंद?

भिवापूर : कोरोना प्रतिबंधीत लसीचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे शिल्लक २०० डोजच्या बळावर शुक्रवारी भिवापूर व नांद केंद्रावर लसीकरण झाले. उर्वरित सर्व केंद्र लसीअभावी बंद होते. आता लसीकरणासाठी तालुका व्यवस्थापनाकडे लसीचा एकही डोज शिल्लक नाही. त्यामुळे उद्यापासून (दि.१०) तालुक्यात ‘मिशन लसीकरण’ थांबणार हे निश्चीत आहे. तालुक्यात लस संपल्याने जिल्हा प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कार्यप्रणालीवर जनसामान्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या गेल्यात. त्यामुळे किमान आता तरी लसीचे मुबलक डोस उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती. मात्र तिही सध्या धुळीस मिळाली आहे. जिल्हास्तरावरून लसीचा अपेक्षीत पुरवठा होत नसल्याने ही गंभीर समस्या उभी ठाकली आहे. तालुक्यात स्थानिक ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा, जवळी, नांद व इतर आरोग्य उपकेंद्रासह ग्रामपंचायतस्तरावर लसीकरण सुरू होते. गुरुवारी भिवापूर व नांद वगळता सर्वच लसीकरण केंद्रातील लसीचे डोस संपले. त्यामुळे या सर्व केंद्रावर शुक्रवारी लसीकरण झाले नाही. भिवापूर व नांद केंद्रामध्ये कालच्या लसीकरणात २०० च्या जवळपास डोस शिल्लक होते. त्यामुळे या दोन केंद्रावर लसीकरण झाले. लस संपल्याने अनेकांना केंद्रातून लसीविनाच परतावे लागले. आता तालुक्यात लसीचा एकही डोस शिल्लक नसल्याचे कळते.

मिरीची कटाई कामगारांना लसीची आवश्यकता

मिरची कटाई केंद्र हे भिवापूरकरांचे उदनिवार्हाचे प्रमुख साधन आहे. सुमारे ४ हजारावर महिला व पुरूष मजूर येथे काम करतात. सर्दी, खोकला, अंगदुखी हे त्यांच्यासाठी नेहमीचे दुखणे आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता येथे संसगार्चा प्रकोप बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संसर्गाशी लढण्याकरीता कार्यरत प्रत्येक मजुराला लस देणे आवश्यक आहे. मात्र आता लसीचे डोस संपल्याने मजूरांच्या नशीबी पुन्हा उपेक्षाच आल्या आहे.

-

कोरानाशी लढा देण्याकरीता लसीकरण महत्वाचे आयुध आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता, प्रत्येकजण लस घेण्यासाठी धडपडत आहे. माञ आठवडाभरापासून सुरू असलेला तुटवडा व आता लसीचे डोस संपल्याने मिशन लसीकरण केवळ तोंडसुख देणारे ठरले आहे. शासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- प्रमोद रघूशे, भिवापूर

Web Title: What about 'Mission Vaccination' in Bhivapur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.