शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाला नायलॉन मांजा दिसला तेव्हा अधिकाऱ्यांचे डोळे बंद होते का? किती पोलिसांवर कारवाई केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:23 IST

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर दंड ठोठावण्याचा आदेश दिला असतानाही मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी सर्वत्र नायलॉन मांजाचा वापर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने कठोर दंड ठोठावण्याचा आदेश दिला असतानाही मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी सर्वत्र नायलॉन मांजाचा वापर करण्यात आला. परंतु त्या तुलनेत महानगरपालिका अधिकारी व पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई केली नाही. न्यायालयाने मंगळवारी ही बाब लक्षात घेता मनपा अधिकारी व पोलिसांवर कडक ताशेरे ओढले. आम्हाला सर्वत्र नायलॉन मांजा दिसून आला, पण अधिकाऱ्यांनी त्यांचे डोळे बंद ठेवले होते का?, असे न्यायालय म्हणाले.

न्यायालयात नायलॉन मांजाविरोधात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. पोलिसांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांविरोधात केवळ दोन गुन्हे दाखल केले आहेत, अशी मौखिक माहिती सरकारी वकिलाने यावेळी दिली.

त्यावर न्यायालयाने असमाधान व तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, न्यायालयाच्या आदेशाला गांभीर्याने घेणे आवश्यक होते, पण तसे झालेले दिसत नाही, असे नमूद करून मनपा आयुक्त व पोलिस आयुक्त यांना नायलॉन मांजावरील कारवाईसंदर्भात येत्या ३० जानेवारीपर्यंत सत्य माहितीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. प्रतिज्ञापत्रातील माहिती अयोग्य आढळून आल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी तंबीही दिली.

किती पोलिसांवर कारवाई?

नायलॉन मांजामुळे अनुचित घटना घडलेल्या क्षेत्रातील जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली का? अशी विचारणादेखील न्यायालयाने पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक यांना केली. तसेच, यासंदर्भात प्रतिज्ञापत्र मागितले.

असा आहे दंडाचा आदेश

प्राणघातक नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर २५ हजार रुपये आणि विकणाऱ्यांवर अडीच लाख रुपये दंड ठोठावण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दंडाची रक्कम जमा करण्यासाठी विशेष बँक खातेही सुरू करण्यात आले आहे.

अपघातांची माहिती मागितली

जिल्ह्यामध्ये नायलॉन मांजामुळे किती नागरिक जखमी झाले आणि किती नागरिकांना प्राण गमवावे लागले, याची घटनास्थळासह माहिती सादर करा, असे निर्देश न्यायालयाने या प्रकरणातील न्यायालयमित्र अॅड. निश्चय जाधव यांना दिले. 

English
हिंदी सारांश
Web Title : High Court Questions Inaction on Nylon Manja; Seeks Action Report

Web Summary : High Court rebuked officials for failing to curb nylon manja use during Makar Sankranti. Despite a ban and fines, violations persisted. The court demands action reports from police and municipal commissioners, threatening consequences for non-compliance and seeking details on nylon manja related accidents.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय