शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

इटलीत पर्यटनासाठी गेले आणि काळाने गाठले; रस्ते अपघातात नागपूरमधील दाम्पत्याचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: October 3, 2025 20:47 IST

मुलगी गंभीर जखमी : पर्यटनासाठी गेले अन् वज्राघात झाला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : इटलीत पर्यटनासाठी गेलेल्या नागपुरातील दाम्पत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यांनी मुलगी या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. ग्रोसेटोजवळील राज्य महामार्ग एक ऑरेलियावर हा अपघात झाला. या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, संबंधित कुटुंबाचे नातेवाईक शोकाकुल झाले आहेत.

मृत दाम्पत्यामध्ये जावेद अख्तर (५५, सिव्हिल लाइन्स) आणि त्यांची पत्नी नादिरा गुलशन (४७) यांचा समावेश आहे. ते सीताबर्डी येथील हॉटेल गुलशन प्लाझाचे मालक आहेत. त्यांची मोठी मुलगी आरजू अख्तर (२२) हिची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे, तर धाकटी मुलगी शिफा अख्तर (२०) आणि मुलगा जाजेल अख्तर (१४) हेही या अपघातात जखमी झाले आहेत. जावेद अख्तर दरवर्षी नवरात्रीत त्यांच्या कुटुंबासह विविध देश-विदेशात प्रवास करत असत. यावेळी ते २३ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी नादिरा गुलशन, मोठी मुलगी आरजू अख्तर, धाकटी मुलगी शिफा अख्तर आणि मुलगा जाजेल अख्तर यांच्यासह रोमला रवाना झाले होते. ५ ऑक्टोबर रोजी कुटुंब नागपूरला परतणार होते. गुरुवारी सकाळी इटलीच्या ग्रोसेटाजवळ हे कुटुंब सहलीसाठी निघाले होते, तेव्हा अपघात झाला. उत्तर दिशेकडे जाणाऱ्या कॅरेजवेवर एक व्हॅन आणि आशियाई वंशाच्या पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नऊ आसनी मिनीबसचा समावेश होता. व्हॅनमधील तिघांना मदत खूप उशिरा पोहोचली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच, कुटुंबातील काही सदस्य इटलीला रवाना झाले आहेत.

मुलाने शुद्धीवर येताच नागपूरला फोन केला

प्राप्त माहितीनुसार, अपघात झाल्यावर मुलगा जाजेल अख्तर कारची खिडकी तोडून कारमधून बाहेर पडला. त्याने साइनबोर्डवर दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधला आणि स्थानिक प्रशासनाला अपघाताची माहिती दिली. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुलगा शुद्धीवर आला आणि त्याने ताबडतोब नागपूरमधील त्याच्या नातेवाइकांना फोन करून घटनेची माहिती दिली.

भारतीय दूतावासाचा शोकसंदेश

अख्तर दाम्पत्याच्या मृत्यूनंतर इटलीतील भारतीय दूतावासाने शोकसंदेश जारी केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो, तसेच जखमी सदस्य लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अख्तर कुटुंबीयांशी दूतावास संपर्कात असून, हरतऱ्हेने त्यांचे सहकार्य करण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur couple dies in Italy road accident; daughter injured.

Web Summary : A Nagpur couple died in a road accident in Italy while on vacation. Their daughter is seriously injured. Javed Akhtar and Nadira Gulshan, owners of Hotel Gulshan Plaza, were killed near Grosseto. The Indian Embassy is providing assistance.
टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात