लग्नासाठी बाहेरगावी गेले, चोरट्याने १.५४ लाखांचे दागीने नेले

By दयानंद पाईकराव | Updated: April 20, 2024 18:23 IST2024-04-20T18:23:34+5:302024-04-20T18:23:43+5:30

सुरेश मारोतराव लोणारे (५६, रा. हरिभाऊ कोलते अपार्टमेंट, नंदनवन) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबीयांसह नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते.

Went out of town for marriage, thieves took jewelery worth 1.54 lakhs | लग्नासाठी बाहेरगावी गेले, चोरट्याने १.५४ लाखांचे दागीने नेले

लग्नासाठी बाहेरगावी गेले, चोरट्याने १.५४ लाखांचे दागीने नेले

नागपूर : नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील १० हजार रुपये रोख आणि सोन्याचांदीचे दागीने असा एकुण १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १९ एप्रिलला सायंकाळी ६.३० ते शनिवारी रात्री २ वाजताच्या सुमारास घडली.

सुरेश मारोतराव लोणारे (५६, रा. हरिभाऊ कोलते अपार्टमेंट, नंदनवन) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबीयांसह नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून लोखंडी आलमारीतील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागीने व रोख १० हजार असा एकुण १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: Went out of town for marriage, thieves took jewelery worth 1.54 lakhs