लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात. राज्यात २० मार्चला लॉकडाऊन झाले. आज एक महिना झाला आहे. पण ही २६ कुटुंबे आजही चिखली चौकात पालाच्या झोपडीत वास्तव्य करीत आहेत. ते परराज्यातील असल्यामुळे त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाही. त्यामुळे रेशनच्या धान्यापासून ते वंचित आहेत. स्थानिक नगरसेवक मतदार नसल्याने त्यांची खायची सोय करीत नाही. स्थलांतर करायचे म्हटेल तर शक्य नाही. आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा, अशी आर्त हाक या कुटुंबीयांनी दिली आहे.
आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा! उत्तर प्रदेशातील २६ कुटुंबीयांच्या वेदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 00:01 IST
कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात.
आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा! उत्तर प्रदेशातील २६ कुटुंबीयांच्या वेदना
ठळक मुद्देपरराज्यात आम्ही परकेच