विसर्जनासाठी विहीर व तलावाचे पाणी
By Admin | Updated: September 22, 2015 03:50 IST2015-09-22T03:50:01+5:302015-09-22T03:50:01+5:30
गणेश विसर्जनासाठी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्ये पिण्याचे पाणी आणून टाकले जात असल्याचे

विसर्जनासाठी विहीर व तलावाचे पाणी
नागपूर : गणेश विसर्जनासाठी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्ये पिण्याचे पाणी आणून टाकले जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले होते. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच जलकुंभावरून पाणी देणे बंद करण्यात आले. कृत्रिम तळ्यासाठी पर्यायी उपलब्ध पाण्याचा वापर करण्यात यावा. ज्या ठिकाणी पर्याय नसेल तेथेच जलकुंभाच्या पाण्याचा वापर क रण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने सोमवारी दिले.
शहरातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी व जलप्रदूषण रोखण्यासाठी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन तलावात करू नये. यासाठी कृत्रिम टँक निर्माण करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात तसेच तलावाच्या किनाऱ्यावर ११८ ठिकाणी कृ त्रिम तळे निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील अर्ध्याहून अधिक कृत्रिम टँक तयार झाले आहेत.
फुटाळा तलाव, सक्करदरा तलाव, गांधीसागर तलाव, सोनेगाव तलाव आदी भागात कृत्रिम टँक उभारण्यात आले. प्रशासनाने जलकुंभावरील पाणी देणे बंद केल्याने फुटाळा तलावाच्या काठावरील कृत्रिम टँकमध्ये तलावातील पाण्याचा वापर करण्यात आला. इतर तलावच्या ठिकाणी तसेच शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या कृ त्रिम तळ्यासाठी विहीर वा तलावाच्या पाण्याचा वापर करण्यात आला. कृत्रिम तळ्यासाठी पर्यायी पाण्याचा वापर करण्यात आल्याने लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची बचत झाली आहे. तसेच टँकरवरील खर्चातही बचत झाली आहे. शहरातील काही भागातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. टँकरची प्रतीक्षा करावी लागते. दुसरीकडे कृत्रिम टँकसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
पिण्याच्या पाण्याचा वापर न करता जिथे-जिथे शक्य आहे तिथे पर्यायी पाण्याचा वापर क रण्याच्या सूचना केल्याची माहिती जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)
शक्य तिथे पर्यायी पाण्याचा वापर
सोनेगाव तलावातील पाणी कृत्रिम टँकसाठी वापरणे शक्य आहे. परंतु फुटाळा तलाव, गांधीसागर तलावातील पाणी वापरण्याजोगे नाही. दक्षिण नागपुरात कृत्रिम टँकसाठी विहिरीच्या पाण्याचा वापर केला जात आहे. जिथे-जिथे जलकुंभातील पाण्याला पर्याय आहे. अशा ठिकाणी या पाण्याचा वापर केला जाणार आहे. पर्याय नसेल तेव्हाच जलकुंभाच्या पाण्याचा वापर करण्याच्या सूचना जलप्रदाय विभागाला केल्या आहे.
प्रवीण दटके, महापौर, मनपा
पर्याय नसेल तेथेच वापर
कृत्रिम टँकसाठी पाण्यासाठी विहिरीच्या पाण्याचा वापर केला जात आहे. तलावातील पाणी घाण दिसते. ते वापरण्याजोगे नाही व दुसरा पर्याय नाही अशाच ठिकाणी जलकुंभातील पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी या पाण्याचा असा वापर केला जाणार आहे. तीन दिवसच याची गरज भासणार आहे.
श्रावण हर्डीकर, आयुक्त, मनपा