लसीकरणासाठी आलेल्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:16+5:302021-03-09T04:09:16+5:30
नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर येणाऱ्या महिलांचे ...

लसीकरणासाठी आलेल्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत ()
नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर येणाऱ्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. झोन सभापती सुनील हिरणवार यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला. तसेच कोविड- १९ मध्ये काम केलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी सुनील हिरणवार यांच्यासह सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कांचन किंमतकर, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला पुरी, डॉ. मयूरी, ज्योती मानकर, रेणुका बावनकर, रेखा रेवतकर, माधुरी आगरकर, वंदना पेंडाम, सुरेखा पंडित, रजनी फुलझेले, जया तांबे, सुनीता पंधरे, दीपाली पटले, ज्योत्स्ना विरुळकर व विजय कुंभारे आदी उपस्थित होते.