कोराडीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 20:00 IST2021-12-14T20:00:05+5:302021-12-14T20:00:54+5:30
कोराडी व महादुला येथे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कोराडीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे जंगी स्वागत
नागपूरः कोराडी व महादुला येथे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोराडी मंदिर टी पॉईंटपासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर गुलाल आणि फुलांची उधळण केली.
याप्रसंगी त्यांच्या अर्धांगिनी ज्योती बावनकुळे, पुत्र संकेत बावनकुळे, मुलगी पायल आष्टनकर, महादुल्याचे नगराध्यक्ष राजेश रंगारी, कोराडीचे सरपंच नरेंद्र धानोले, मनोज सावजी, बापू बिरखेडे, लोणखैरीचे सरपंच लीलाधर भोयर, कुणाल भोसकर ,देवेंद्र बुलाखे, संजय कडू, प्रीतम लोहासारवा, उमेश निमोणे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.