शशांक मनोहर यांचे नागपुरात स्वागत
By Admin | Updated: November 10, 2015 03:37 IST2015-11-10T03:37:40+5:302015-11-10T03:37:40+5:30
बीसीसीआय अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे चेअरमन अॅड. शशांक मनोहर यांचे नव्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर सोमवारी रात्री शहरात आगमन झाले.

शशांक मनोहर यांचे नागपुरात स्वागत
नागपूर : बीसीसीआय अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे चेअरमन अॅड. शशांक मनोहर यांचे नव्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर सोमवारी रात्री शहरात आगमन झाले.
यावेळी विदर्भ क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आणि क्रिकेट चाहत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत केले. मुंबई येथे आजच सकाळी बीसीसीआयच्या वार्षिक आमसभेत यापूर्वीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी करीत मनोहर यांची आयसीसी चेअरमनपदी बीसीसीआय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने आयसीसी चेअरमनपदाचा त्यांचा मार्ग मोकळा झाला.
मनोहर हे पुढील जूनपर्यंत आयसीसी चेअरमन पदावर राहणार आहेत. मनोहर यांचे रात्री इंडियन एअरलाईन्सच्या विमानाने रात्री ९.१५ च्या सुमारास आगमन झाल्यानंतर त्यांचा मुलगा अद्वैत, स्नुषा आणि चिमुकली नात आदितीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाठोपाठ चाहत्यांनीही पुष्गुच्छ दिले. मनोहर यांनी सर्वांच्या अभिनंदनाचा स्वीकार केल्यानंतर यावेळी उपस्थित पत्रकारांशी न बोलताच निवासस्थानाकडे रवाना झाले. (क्रीडा प्रतिनिधी)