शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नागपुरात रणजी विजेत्या विदर्भ संघाचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:51 IST

६० वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरताना देशातील क्रिकेट वर्तुळाला दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या   विदर्भ संघाचे चॅम्पियन्सच्या थाटात शानदार स्वागत झाले.

ठळक मुद्देकेक कापला, मिठाई वाटलीआतषबाजी अन् ढोलताशांचाही गजर

आॅनलाईन लोकमतनागपूर :६० वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरताना देशातील क्रिकेट वर्तुळाला दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या   विदर्भ संघाचे चॅम्पियन्सच्या थाटात शानदार स्वागत झाले.जल्लोषपूर्ण वातावरणात चाहते आणि कुटुंबीयांनी खेळाडूंवर पुष्पवर्षाव केला तर व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी केक कापून आनंद द्विगुणित केला. ढोलताशांच्या गजरात चाहत्यांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला होता. खेळाडूंच्या दिमाखदार स्वागताचा हा अविस्मरणीय क्षण उपस्थितांनी हृदयात साठवून ठेवला.फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाने सोमवारी इतिहास घडविताना इंदूरमध्ये फायनलमध्ये दिल्लीवर मात करीत रणजी चषक पटकावून दिला. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेट वर्तुळात नवा उत्साह संचारला. विजेत्या संघाचे बुधवारी रात्री मुंबईमार्गे रात्री ९ च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.बंदचा फटका.. आगमनास विलंबभीमा कोरेगाव घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र  बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदचा फटका विमानसेवेला बसल्यामुळे विदर्भ संघाचे नागपुरात आगमन लांबले. सायंकाळी ४.५० ला जेट एअरवेजने संघ मुंबईतून नागपुरात येणार होता, पण विमान रद्द झाल्याने अखेर रात्रीच्या गो-एअरवेजने खेळाडू येथे पोहोचले.खेळाडू विमानतळाबाहेर येताच कर्णधार फैज फझल याने विजेता करंडक उंचावून चाहत्यांना अभिवादन केले. महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख, विदर्भ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद जैस्वाल, उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, सचिव बी. एस. भट्टी, शरद पाध्ये, मनपा क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पारंपरिक ढोल ताशांच्या गजराचा मोह सिद्धेश नेरळला आवरणे कठीण झाले होते. त्याने चाहत्यांसोबत नाचून आनंद व्यक्त केला. यावेळी कर्णधार फैज, आदित्य सरवटे, अक्षय वाडकर आणि संजय रामास्वामी यांच्या कुटुंबातील सदस्य आवर्जून उपस्थित होते. यानंतर खेळाडूंना ग्रीन बसमधून व्हीसीए सिव्हील लाईन्स येथे नेण्यात आले. तेथे व्हीसीए पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघाने केक कापला.मनोहर यांच्या उपस्थितीत उद्या सत्कारविजेत्या विदर्भ क्रिकेट संघाचा सत्कार उद्या शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता व्हीसीए सिव्हील लाईन्स येथील हिरवळीवर होणारआहे. आयसीसी अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर हे मुख्य पाहुणे राहतील. मनोहर यांच्या हस्ते खेळाडू, कोचेस आणि सपोर्ट स्टाफला रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.

टॅग्स :Cricketक्रिकेटRanji Trophyरणजी करंडक