शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

नागपूर जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत गारपीटने ! हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:18 PM

नागपूर जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात एक जानेवारीला जोराच्या पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात एक जानेवारीला जोराच्या पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. गारपीटची शक्यता विचारात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. हवामान विभागाने नववर्षात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार वेस्टर्न डिस्बेन्स निर्माण झाला आहे. याचा प्रभाव सोमवारी मध्यरात्रीपासून दिसेल. तसेच उत्तर प्रदेश,राजस्थान येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागपूर शहर व परिसरात पावसाची शक्यता आहे. सध्या उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे सरासरीच्या तुलनेत पारा खाली आला आहे. सोमवारी तापमान ६.५ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. पारा सरासरीपेक्षा ६ अंश खाली असल्याने थंडीपासून दिलासा मिळाला नाही. सकाळी ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता ९० टक्के नोंदविण्यात आली. त्यामुळे गेल्या २४ तासात तापमानात १.९ अंशाने वाढ झाली. परंतु कमाल तापमान दोन अंश खाली २६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले.उत्साहावर पाणी तर फिरणार नाही?नवीन वर्षाच्या स्वागताची शहरात जय्यत तयारी सुरू आहे. फुटाळा सोबतच सार्वजनिक स्थळे, खुले लॉक, ओपन गाडंन रेस्टारेन्ट आदी ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. परंतु पाऊ स आला तर सर्वाच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Hailstormगारपीटnagpurनागपूर