शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

नागपुरात ‘माझी मेट्रो’चे उत्साहात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:28 IST

महामेट्रो नागपूरच्या प्रकल्पांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. चेन्नई येथून निघालेले माझी मेट्रोचे कोचेस दहा दिवसांच्या प्रवासानंतर मंगळवारी नागपुरात पोहोचले. कोचेसचे आगमन पाहून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. खापरी उड्डाणपुलाजवळ लेझिम, ढोल ताशाच्या मिरवणुकीत मेट्रो कोचेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देलेझिम, ढोल ताशा आणि पुष्पवर्षाव : नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रो नागपूरच्या प्रकल्पांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. चेन्नई येथून निघालेले माझी मेट्रोचे कोचेस दहा दिवसांच्या प्रवासानंतर मंगळवारी नागपुरात पोहोचले. कोचेसचे आगमन पाहून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. खापरी उड्डाणपुलाजवळ लेझिम, ढोल ताशाच्या मिरवणुकीत मेट्रो कोचेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

डाऊन टाऊन झोनच्या रोटरी क्लबद्वारे विधिवत स्वागत करण्यात आले. नागरिकांची मेट्रो कोचेस बघण्याकरिता एकच गर्दी झाली. नागपूरकरांनी कोचेसचे स्वागत फुलांचा वर्षाव करून हर्षोल्हासात केले. ड्रोनद्वारे कार्यक्रमाचे छायाचित्रण करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनीही सहभाग घेतला. मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनीही हा क्षण मोबाईल कॅमेरामध्ये टिपला. ट्रेलरला वर्धा मार्गावरून मिहान डेपोपर्यंत नेण्यात आले. कोचेसची जोडणी करून धावण्यासाठी सज्ज करण्यात येणार आहे. 
चीनमधील दालीयान येथून १५ डिसेंबरला निघालेले कोचेस समुद्री मार्गाने ५ जानेवारीला चेन्नई बंदरात आणण्यात आले. कोचेस चेन्नई येथून लॉजिस्टिकच्या माध्यमातून ६ जानेवारीला रात्री रवाना करण्यात आले. १० दिवसांच्या प्रवासानंतर आणि १५ कर्मचाऱ्यांच्या परिश्रमानंतर नागपुरात पोहोचले. ट्रेलरची गती २० ते ३० कि़मी. प्रति तास होती. एका ट्रेलरवर एक कोच ठेवण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक रात्री करण्यात आली.या कोचमध्ये दोन व्हॅकुम सर्किट ब्रेकर्स, इथरनेट बेस्ड ट्रेन कंट्रोल आणि मॅनेजमेंट यंत्रणा आहे. त्यामुळे सुरक्षा आणि विश्वसनीयेत वाढ होणार आहे. याशिवाय सुरक्षा, डिझाईन, मेट्रोच्या आतील फिचर हे अत्याधुनिक आणि सर्व सुविधायुक्त आहे. कोचेसमध्ये लहान मुलांसह महिला आणि वृद्धांसाठी आवश्यक सोईसुविधा आहेत. आंतरिक कलाकृती, एलईडी बल्ब, आपत्कालीन दरवाजे, एलईडी आधारित मार्गदर्शिका, स्वयंचलित घोषणा प्रणाली, नैसर्गिक थीम कोचेसवर आकारण्यात आल्या आहेत.याप्रसंगी महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) नरेंद्र उपाध्याय, उपमहाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) रमण, रोटरी व्लब नागपूर डाऊन टाऊनचे पदाधिकारी निशिकांत काशीकर, स्नेहल काशीकर, पंकज दहीकर, संदीप हटेवार, अपूर्व नायक, मंथन पटले, सुरेश लांगे व नागपूर सायकलिंग ग्रुपचे नीतू काटेर, प्रियंका देवासे, सोनल बरबटकर उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोNAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन