पुन्हा लागणार विकेंड लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:52+5:302021-06-27T04:06:52+5:30

दुकाने, बाजार दुपारी ४ पर्यंतच : जीवनावश्यक वस्तू , किराणा- भाजीपाला आठवडाभर सुरू लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

Weekend lockdown will happen again | पुन्हा लागणार विकेंड लॉकडाऊन

पुन्हा लागणार विकेंड लॉकडाऊन

दुकाने, बाजार दुपारी ४ पर्यंतच : जीवनावश्यक वस्तू , किराणा- भाजीपाला आठवडाभर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे कोरोनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जुन्या नियमावलीत बदल केल्यानंतर नागपुरातही सोमवार, २८ जूनपासून पुन्हा निर्बंध अधिक कठोर केले जात आहे. नागपूरला लेव्हल ३ च्या कॅटेगिरी महापालिकेत ठेवण्यात आले आहे. वास्तविक गेल्या दोन आठवड्यात नागपूर शहरातील संक्रमण दर कमी होण्यासोबतच मृत्यू कमी झाला आहे. रुग्णालयात ९८ टक्के बेड खाली आहेत; परंतु राज्य सरकारच्या आदेशानुसार निर्बंध घालण्याचा निर्णय महापालिका व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शहरासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी तर ग्रामीणसाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे शुक्रवारी रात्री उशिरा वेगवेगळे आदेश जारी केले.

नवीन आदेशानुसार सर्व दुकाने दुपारी ४ पर्यंतच खुली ठेवता येतील, तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने, किराणा व भाजीपाला वगळता अन्य सर्व दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. विकेंड लॉकडाऊन पुन्हा एकदा शहरात लागू केला जात आहे. मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, धार्मिक स्थळ, स्विमिंग पूल बंद राहतील. शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, अन्य शैक्षणिक संस्था बंद राहतील; परंतु प्रवेश, प्रशासकीय कामकाज, परीक्षा, ऑनलाइन क्लासेस, प्रात्यक्षिक परीक्षा घेता येईल. हा आदेश २८ जूनपासून पुढील आदेशापर्यंत कायम राहील. सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमात जास्तीतजास्त ५० लोकांना सहभागी होता येईल. दुपारी ४ पर्यंतच आयोजन करता येईल. आधी १०० लोकांना परवानगी होती. सायंकाळी ५ पर्यंत जमावबंदी तर त्यानंतर संचारबंदी राहील.

...

असे आहेत नवीन निर्बंध

-अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस चार वाजेपर्यंत सुरू राहणार

-अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने चार वाजेपर्यंत सुरू (शनिवार, रविवारी पूर्ण बंद )

- मॉल्स, चित्रपटगृहे(मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रीन ) बंद राहतील.

-सार्वजनिक बस सेवा ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार. उभ्याने प्रवासास परवानगी नाही.

-रेस्टॉरण्ट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू राहील. नंतर पार्सल सेवा सुरू राहील.(शनिवार, रविवारी पूर्ण बंद )

- लोकल ट्रेनमध्ये मेडिकल व आवश्यक सेवा संबंधित लोकांना प्रवास करता येईल.

-सार्वजनिक स्थळे, मैदाने, उद्याने, वॉक, सायकलिंगला रोज पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेत मुभा

-शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.(कोरोना व आवश्यक सेवा वगळून)

-आउटडोअर स्पोर्ट्स सकाळी ५ ते सकाळी ९ व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सुरू ठेवता येणार

-शुटींगला बायो बबलमध्ये अनुमती राहील. सायंकाळी ५ नंतर बाहेर कोणत्याही गतीविधी होणार नाहीत.

-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठका, निवडणूक , आमसभा ऑनलाइन होतील.

-कृषी सेवा संबंधित साहित्य विक्री ४ वाजेपर्यंत आठवडाभर सुरू राहील.

-सार्वजनिक बस १०० टक्के अनुमनी (उभ्याने प्रवास नाही.)

-ई- कॉमर्स सेवा, माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन लोकांसह)

- धार्मिक स्थळे, स्विमिंग पूल बंद राहतील.

-लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची अट राहील.

-अंतिम संस्काराला २० लोकांनाच उपस्थित राहता येईल.

-व्यायामशाळा, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं चालवता येणार

-खासगी कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था बंद राहतील. ऑनलाइन शिक्षणास मुभा राहील.

-गोरेवाडा, महाराजबाग, बोटनिकल गार्डन - दुपारी ४ पर्यंत सुरू राहील.

-अ‍ॅम्युजमेंट पार्क -४ पर्यंत (वॉटर स्पोर्ट वगळून)सुरू राहील.

-ग्रंथालय, अभ्यासिका दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील.

आधार कार्ड केंद्र - दुपारी ४ पर्यंत सुरू

स्कील डेव्हलपमेंट सेंटर - दुपारी ४ पर्यंत सुरू

बोटींग दुपारी ४ पर्यंत सुरू राहील.

......

Web Title: Weekend lockdown will happen again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.