शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट घालूनच रॅलीत या!उमेदवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 23:01 IST

निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, त्यावरून आपल्याला गालबोट लागणार नाही, या भीतीपोटी उमेदवारांनी कार्यकर्त्यांना रॅलीत येताना हेल्मेट आणावे, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन नकोच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम अतिशय कडक केले आहेत. दंडाच्या शुल्कात वाढ केली आहे. यावरून सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. महिनाभरापूर्वी शहरातून निघालेल्या महाजनादेश यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले होते. त्यावरून प्रसार माध्यमांनी सरकारला चांगलेच फटकारले होते. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, त्यावरून आपल्याला गालबोट लागणार नाही, या भीतीपोटी उमेदवारांनी कार्यकर्त्यांना रॅलीत येताना हेल्मेट आणावे, असे आवाहन केले आहे.राजकीय पक्षांच्या उमेदवारी घोषित झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरताना आपली शक्ती दाखविण्यासाठी उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांना रॅलीत सहभागी होण्यास आमंत्रण देत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट शेअर केल्या जात आहेत. या पोस्टमध्ये विशेष टीप ही हेल्मेटसाठी दिली आहे. रॅलीत येणाऱ्या प्रत्येक दुचाकी चालक कार्यकर्त्याने हेल्मेट आणावे, असे स्पष्ट बजावले आहे. शुक्रवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शहरातील सहाही विधानसभेत भाजपाचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. काँग्रेसचे चार उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज भरणार आहेत. संविधान चौकात भव्य शक्तिप्रदर्शन होणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातून उमेदवारांच्या स्कूटर, कार रॅली निघणार आहे. नेताच सोबत असल्याने रॅलीदरम्यान कार्यकर्ते वाहतुकीच्या नियमांना मोजत नाहीत. पण यावेळी नेत्यांनीच सावध पवित्रा घेतला आहे. निवडणुकीदरम्यान आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी, कायद्याच्या कुठल्याही कचाट्यात न सापडण्यासाठी हेल्मेट सक्तीचे आवाहन केले आहे.भाजपाला नियमांची धास्ती, काँग्रेस बिनधास्तकाँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांनी रॅलीत सहभागी होण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले आहे. भाजप उमेदवारांनी केलेल्या पोस्टमध्ये रॅलीत हेल्मेट वापरावे अशी स्पष्ट टीप दिली आहे. यावरून भाजप उमेदवारांना नियमांची धास्ती असल्याचे दिसते आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी फक्त रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार वाहतुकीच्या नियमांबाबत बिनधास्त असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर