आॅनलाईन लोकमतनागपूर : कर्नाटकमध्ये झालेल्या धर्मसंसदेत संतांनी केलेल्या आवाहनानुसार बजरंगदलातील प्रत्येक सदस्य शस्त्र बाळगणार आहे. बजरंगदलाच्या देशभर सुरू असलेल्या भरती अभियानात दोन लाख नव्याने बजरंगी जोडण्याचा संकल्प आहे. नागपुरात १९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत भरती अभियान राबविण्यात येणार आहे. नागपुरात २५ हजारांचे लक्ष्य असून, अभियानानंतर धर्मरक्षणासाठी त्रिशूळ दीक्षा समारंभ होणार आहे. यात प्रत्येक बजरंगीला शस्त्राच्या रूपात त्रिशूळ देण्यात येणार आहे. संतांच्या आवाहनानुसार राम मंदिर आंदोलनाचे बिगुल पुन्हा फुंकण्याची शक्यता असल्याचे बजरंग दलाचे संयोजक मनीष मौर्य यांनी पत्रपरिषदेत सांगितले. पत्रपरिषदेला प्रशांत तितरे, राजकुमार शर्मा, संकेत आंबेकर, मोहन दिकोंडवार, राजेश शुक्ला, जितु कुंदवानी, विशाल पुंज उपस्थित होते.
धर्मसंसदेतील संतांच्या आवाहनानुसार बजरंगी बाळगणार शस्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 22:58 IST
कर्नाटकमध्ये झालेल्या धर्मसंसदेत संतांनी केलेल्या आवाहनानुसार बजरंगदलातील प्रत्येक सदस्य शस्त्र बाळगणार आहे. बजरंगदलाच्या देशभर सुरू असलेल्या भरती अभियानात दोन लाख नव्याने बजरंगी जोडण्याचा संकल्प आहे.
धर्मसंसदेतील संतांच्या आवाहनानुसार बजरंगी बाळगणार शस्त्र
ठळक मुद्देदेशात दोन लाख नवे बजरंगी जोडणारनागपुरात २५ हजाराचे लक्ष्य