शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

आम्हाला अंतराळाची सफर केल्याचा भास झाला !

By गणेश हुड | Updated: April 25, 2024 15:13 IST

Nagpur : विद्यार्थ्यांनी इस्त्रो भेटीच्या सीईओ पुढे उलगडल्या आठवणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  इस्रोची दुनियाच वेगळी आहे. आम्ही वेगळ्याच ठिकाणी आल्याचे वाटत होते.  येथे  वेगवेगळ्या  प्रतिकृती, मिसाइल बघितले. अवकाशगंगेतील रहस्य जाणून घेता आले. आम्हाला खूप काही शिकता आले. आम्हाला जणू अंतराळाची सफर केल्याचा भास झाला असे अनुभव  जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी इस्रोभेटीवरून परतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्याशी शेअर केले.

कॉफी वुईथ सीईओ या  उपक्रमांतर्गत सौम्या शर्मा यांनी  अभ्यास दौऱ्यावरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगळवारी  आपल्या केबिनमध्ये बोलावून  त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना आलेले अनुभव ऐकले.  विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शाळांमधील दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या २५ मुलामुलींचा ग्रुप कर्नाटकातील म्हैसूर येथील अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोभेटीला गेला होता. यामध्ये पाचगाव, बोथिया पलोरा, कोदामेंढी व नांद हायस्कूलमधील विद्यार्थी, तर पीएमश्री शाळा तारणा तसेच मुख्यमंत्री माझी सुंदर जिल्ह्यातील प्रथम शाळा भारकस व आदिवासी भागातील सावरा शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांची ही भेट त्यांना पुढील शैक्षणिक जीवनात उपयोगी ठरावी.  त्यांच्या ज्ञानात भर पडावी या  हेतुनें प्राथमिक शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत आयोजित होती. या विद्याथ्यांनी इस्रोला भेट दिल्यानंतर तेथील अनुभव पाठीशी घेऊन आले. ते अनुभव नक्कीच प्रेरणादायी होते. ही बाब ओळखून सीईओंनी त्यांना जिल्हा परिषद मुख्यालयात आपल्या केबिनमध्ये बोलाविले. सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज करून  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. राज्याबाहेर जाण्याची संधी समग्र शिक्षामधून पहिल्यांदाच मिळाल्याने विद्यार्थ्यांनी  प्रशासनाचे आभार व्यक्त केले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, समग्रचे कार्यक्रमप्रमुख वानखेडे व या उपक्रमात सहभागी शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारStudentविद्यार्थीnagpurनागपूरisroइस्रो