शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विकास मंडळ नको, स्वतंत्र विदर्भ राज्य हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:29 IST

विदर्भ विकास मंडळाची मुदत संपल्याने आता पुन्हा या मंडळाला मुदतवाढ मागणे सुरू झाले आहे. मात्र विदर्भ विकास मंडळ नको तर स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. या मागणीसाठी २६ मे रोजी संपूर्ण विदर्भातील विदर्भवादी कार्यकर्ते लॉकडाऊनमध्ये आपल्याच घरी राहून आंदोलन करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ विकास मंडळाची मुदत संपल्याने आता पुन्हा या मंडळाला मुदतवाढ मागणे सुरू झाले आहे. मात्र विदर्भ विकास मंडळ नको तर स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. या मागणीसाठी २६ मे रोजी संपूर्ण विदर्भातील विदर्भवादी कार्यकर्ते लॉकडाऊनमध्ये आपल्याच घरी राहून आंदोलन करणार आहेत.'विदर्भ विकास मंडळ नको, आम्हाला हवे स्वतंत्र विदर्भ राज्य’ असे फलक तयार करून तशा घोषणा देऊन याचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे. विदर्भ विकास मंडळाची मुदत ३० एप्रिलला संपली. ती वाढवून देण्याची मागणी सध्या विदर्भातील काही नेत्यांकडून तसेच आजी-माजी मंत्र्यांकडून होत आहे. मात्र या मागणीचा विदर्भवाद्यांनी विरोध दर्शविला आहे. अकोला व नागपूर करार सरकारने पाळला नाही. विदर्भ विकास मंडळ गठित करून केवळ भ्रमनिरास केला. त्यामुळे आता पुन्हा ती वेळ यायला नको. यासाठी वेगळा विदर्भ हाच पर्याय, असे विदर्भवाद्यांनी म्हटले आहे. तत्कालीन संविधानात तरतूद करून विदर्भ विकास मंडळाची घोषणा करून विदर्भातील जनतेला आकर्षित केले. परंतु ३८ वर्ष मंडळ तयारच केले नाही. शेवटी १९९४ साली विदर्भ विकास मंडळाची स्थापना केली. या मंडळाला केव्हाच पूर्ण निधी दिलाच नाही. परिणामी हे विदर्भ विकास मंडळ कुचकामी ठरले. हा शोभेचा पांढरा हत्ती आम्हाला नको, स्वतंत्र विदर्भ राज्य, ही मागणी सरकारने मान्य करावी यासाठी हे आंदोलन असणार आहे. विदर्भातील ११ ही जिल्ह्यांचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा अध्यक्षांच्या सहीची ११ पत्रे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविले जाणार असल्याची माहिती मुख्य संयोजक राम येवले यांनी दिली आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन