‘आम्ही नायलॉन मांजा विकत नाही’

By Admin | Updated: January 6, 2017 02:25 IST2017-01-06T02:25:08+5:302017-01-06T02:25:08+5:30

बंदी घालण्यात आली असतानाही शहरातील पतंग बाजारात नायलॉन मांज्याची विक्री सुरू आहे.

'We Do not Sell Nylon Manza' | ‘आम्ही नायलॉन मांजा विकत नाही’

‘आम्ही नायलॉन मांजा विकत नाही’

दुकानदारांनी लावले फलक : पतंग बाजारात खळबळ
नागपूर : बंदी घालण्यात आली असतानाही शहरातील पतंग बाजारात नायलॉन मांज्याची विक्री सुरू आहे. पतंगांच्या दुकानात लपूनछपून सुरू असलेल्या या विक्रीची पोल उघडकीस आल्यावर पतंग बाजारात खळबळ उडाली आहे. लोकमतने गुरुवारी ‘नायलॉन मांज्याच्या अवैध विक्रीवर ‘स्टिंग’ करीत वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच गुरुवारी पतंग बजरात बहुतांश दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेर ‘आम्ही नायलॉन मांजा विकत नाही’ असे फलक लावले होते. इतवारी येथील मुख्य पतंग बाजारात गुरुवारी फेरफटका मारला तेव्हा या प्रकारचे अनेक फलक पाहायला मिळाले. बुधवरी मात्र अशा कुठल्याही प्रकारचे बोर्ड दुकानाबहेर नव्हते, हे विशेष. या ठिकाणी काही दुकानंच्या आत सुद्धा नायलॉन मांजा विकत नसल्याचे फलक टांगलेले होते. इतवारी व जुनी शुक्रवारी येथील मुख्य पतंग बाजारांशिवाय शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या पतंगाच्या दुकानाबाहेर सुद्धा अशा प्रकारचे फलक लागलेले आहेत. (प्रतिनिधी)

मकरसंक्रांत जवळ आल्यास विक्रीची शक्यता
पतंग बाजाराशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, मकरसंक्रांतीला आता एका आठवड्यापेक्षा अधिक वेळ आहे. यामुळे बहुतांश लोकं अजून पतंगबाजीपसून दूर आहेत. त्यामुळे विक्रीला फारसा प्रतिसाद नाही. मकरसंक्रांती जवळ आल्यास पतंगाची विक्री वाढेल, तेव्हा नायलॉन मांजाची विक्रीसुद्धा लपूनछपून होत राहील. प्रशासनाच्या जागरुकतेमुळेच यावर नियंत्रण आणता येईल.

Web Title: 'We Do not Sell Nylon Manza'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.