आम्ही आहोतच, तुम्हीही सतर्क राहा

By Admin | Updated: August 26, 2014 01:00 IST2014-08-26T01:00:58+5:302014-08-26T01:00:58+5:30

पोलीस सोबतीला आहेतच, मात्र तुम्हीसुद्धा सतर्क राहा. भक्ती आणि श्रद्धेने गणेशोत्सव साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन आज पोलीस आयुक्त

We are you, you too be alert | आम्ही आहोतच, तुम्हीही सतर्क राहा

आम्ही आहोतच, तुम्हीही सतर्क राहा

पोलीस आयुक्त : गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना साद
नागपूर : पोलीस सोबतीला आहेतच, मात्र तुम्हीसुद्धा सतर्क राहा. भक्ती आणि श्रद्धेने गणेशोत्सव साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन आज पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
विशेष म्हणजे, पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी आज उपराजधानीतील गणेशोत्सव आणि पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी जाणून घेतली. या पार्श्वभूमीवर, गणेशपेठेतील हॉटेल रजवाडा पॅलेसमध्ये आज आयुक्तांनी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदा धिकाऱ्यांची, शांतता समितीची बैठक घेतली. बैठकीला बहुतांश गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच सहआयुक्त अनुपकुमार सिंग, अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे, डीसीपी अभिनाश कुमार, श्रीप्रकाश वाघमारे, निर्मला देवी आणि ईशू सिंधू प्रामुख्याने हजर होते.
ध्वनिक्षेपणाचा वापर रीतसर परवानगी घेतल्यानंतरच करावा. मंडळाने मंडप व स्टेज रस्त्यावर उभारू नये. रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यावर गणेशोत्सवाचे कार्यक्रम घेऊ नये, गणेशोत्सवादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. कुणाच्याही भावना दुखावणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांनी केले.
आदर्श गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण
पोलीस आयुक्तालयातर्फे गेल्यावर्षी आयोजित आदर्श गणेश उत्सव स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरणही आज जाहीर करण्यात आले. स्पर्धेत प्रथम पुरस्कार - संती गणेशोत्सव मंडळ, सेंट्रल एव्हेन्यू, तहसील, द्वितीय पुरस्कार - श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कर्मवीर बुक डेपो मागे कोतवाली, तृतीय पुरस्कार - श्री गणेश उत्सव मंडळ बेलीशॉप क्वॉर्टर पाचपावली यांना मिळाली. प्रोत्साहन पुरस्कारांचे मानकरी रेल्वे सुरक्षा बाल गणेश उत्सव मंडळ, अजनी रेल्वे कॉलनी, संकटमोचन गणेश मंडळ, ठाकरे ले-आऊट गिट्टीखदान तसेच बाल हिंद समाज गणेश उत्सव मंडळ हनुमान गल्ली सीताबर्डी ही गणेशोत्सव मंडळे ठरली. या कार्यक्रमाचे संचालन अनुजा घाडगे यांनी तर आभारप्रदर्शन गणेशपेठचे ठाणेदार सुधीर नंदनवार यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: We are you, you too be alert