शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

है तैयार हम !

By admin | Updated: October 14, 2014 01:01 IST

भयमुक्त वातावरणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडावे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त तयारी केली आहे. शहरातील वस्त्यावस्त्यात पोलिसांची गस्त सुरू असताना ग्रामीण

शहर आणि ग्रामीण पोलिसही सज्ज : निमलष्करी दल मदतीलानागपूर : भयमुक्त वातावरणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडावे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त तयारी केली आहे. शहरातील वस्त्यावस्त्यात पोलिसांची गस्त सुरू असताना ग्रामीण पोलिसांनी गुंड, दारू, शस्त्र आणि रोकड पकडण्यासाठी रस्त्यारस्त्यावर फिल्डिंग लावली आहे.विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहे. मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवून, धाक दाखवून मते मिळवण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे कुठे पैसे, कुठे कपडे, कुठे भेटवस्तू तर कुठे दारू वाटली जात असल्याची चर्चा आहे. या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी धावपळ चालवली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात हॉटेल, झोपडपट्ट्यात सर्चिंग सुरू आहे. चौकाचौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. एक हजार पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण चार हजारावर पोलीस कर्मचारी मतदानाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस अकादमीतूनही पीएसआय बंदोबस्ताला बोलवून घेण्यात आले आहे. आयटीबीटी आणि सीआयएसएफ तसेच राज्य राखीव दलासह निमलष्करी दलाच्या सात तुकड्या बंदोबस्तासाठी शहर पोलिसांनी बोलविल्या आहेत. मतदानाच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यासाठी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी आज दिवसभर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. (प्रतिनिधी)ग्रामीण पोलिसही सज्जग्रामीण पोलिसांनीही जबरदस्त तयारी केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी विधानसभा निवडणुकीअनुषंगाने बंदोबस्ताचे चांगले नियोजन केले आहे. १५० पोलीस अधिकारी आणि २०० कर्मचारी तसेच ६२७ होमगार्डच्या मदतीने डॉ. आरती सिंह यांनी मतदानाच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्र, सीआयडी, क्राईम पूणे येथील पोलीस अधिकारी, राज्य व केंद्रीय राखीव दल आणि तामिळनाडू तसेच तेलंगणा येथून निमलष्करी दलाच्या एकूण पाच तुकड्या बोलवून डॉ. सिंह यांनी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणावर गुंडांची धरपकड सुरू आहे. ठिकठिकाणी दारूचा साठा पकडण्यात आला आहे. परप्रांतातून गुंड, बोगस मतदार, शस्त्रसाठा किंवा दारू आणली जाऊ नये म्हणून त्यांनी नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या परप्रांताच्या सीमा सील केल्या आहेत. १८ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यतील गुंडांवर पोलिसांची तीक्ष्ण नजर आहे. वाहनांची आणि संशयित व्यक्तीचीही कसून तपासणी केली जात आहे.