शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात टंचाई असताना पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:36 IST

शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत टँकरद्वारे पाण्याची उधळपट्टी होत असल्याचेही दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत टँकरद्वारे पाण्याची उधळपट्टी होत असल्याचेही दिसून येत आहे.शहराच्या सर्व भागात नळावाटे पाणीपुरवठा करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. २४ बाय ७ योजनेअंतर्गत हा पुरवठा होत आहे. मात्र, या योजनेत विषमता दिसून येत आहे. काही ठिकाणी दिवसातून तीन वेळा, तर काही ठिकाणी दररोज तीन तास आणि काही ठिकाणी अर्धा-पाऊण तास, असा पाणीपुरवठा होत आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापरही अधिक होत आहे. वाठोडा भागात पाणीपुरवठ्याच्या या विषमतेमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष मिटविण्यासाठी नगरसेवकांकडून टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, ज्या टँकर्समधून पाणीपुरवठा केला जातो, त्यातील काही टँकर्स फुटलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसून येते. एकीकडे नळाद्वारे पाणीपुरवठ्यात विषमता, दुसरीकडे फुटलेल्या टँकर्समधून होत असलेली पाण्याची नासाडी आणि तरीही पाण्याच्या समस्येपासून होत नसलेली मुक्ती, या संकटात नागरिक सापडले आहेत.दुरुस्ती करावी अथवा बाद करावे!गेल्या वर्षी नागपुरात पाण्याच्या टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली होती. ते उदाहरण ताजेच असताना यंदा टँकर मालकांना पाण्याची नासाडी होऊ नये, या अनुषंगाने तंबी देण्यात आलेली नसल्याचे दिसून येते. यंदा पाणी मुबलक असले तरी ते टिकवण्यासाठी संपूर्ण व्यवस्था उत्तम असणे गरजेचे आहे. मात्र, फुटलेल्या टँकरला परवानगी देऊन नागरी संपत्तीचे नुकसानच शासन-प्रशासनाकडून होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, अशा टँकर्सची दुरुस्ती करणे अथवा ते बाद करणेच उत्तम ठरेल.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर