शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेल्वे रुळावर चढले भरधाव पाण्याचे टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:23 IST

पाण्याचे टँकर बुधवारी अनियंत्रित होऊन इतवारी-नागभीड रेल्वे लाईनच्या बाजूने जात असताना रेल्वे रुळावर चढले. टँकरचा टायर अचानक फुटल्यामुळे चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. यावेळी इतवारी-नागभीड पॅसेंजर बाजूच्या स्थानकावर उभी होती. टँकर रुळावर चढले त्यावेळी ही गाडी आली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून टँकर चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या एका टँकरच्या साह्याने रुळावर अडकलेल्या टँकरला बाहेर काढण्यात आले.

ठळक मुद्देअपघात टळला : भांडेवाडी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याचे टँकर बुधवारी अनियंत्रित होऊन इतवारी-नागभीड रेल्वे लाईनच्या बाजूने जात असताना रेल्वे रुळावर चढले. टँकरचा टायर अचानक फुटल्यामुळे चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. यावेळी इतवारी-नागभीड पॅसेंजर बाजूच्या स्थानकावर उभी होती. टँकर रुळावर चढले त्यावेळी ही गाडी आली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून टँकर चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या एका टँकरच्या साह्याने रुळावर अडकलेल्या टँकरला बाहेर काढण्यात आले.उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे भांडेवाडीच्या पाण्याच्या टाकीवरून पारडी परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. बुधवारी घडलेल्या घटनेत एक टँकर एकतानगरात पाणीपुरवठा करून परत येत होते. पारडी परिसरातून पाण्याच्या टाकीकडे जात असताना रेल्वे रुळाच्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने भांडेवाडी रेल्वे क्रॉसिंग ओलांडावी लागते. घटनेच्या वेळी भांडेवाडी परिसरातील भोलेनगर येथील रहिवासी टँकरचालक आर. हेडाऊ (४९) रेल्वे क्रॉसिंगकडे येत होता. तेवढ्यात अचानक टँकरचा पुढील टायर फुटला. यामुळे चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. ब्रेक मारण्याऐवजी एक्सलेटर दाबल्यामुळे टँकर रुळ ओलांडून लहान भिंतीवर जाऊन आदळले. टँकरचा काही भाग रुळाच्या मध्यभागी अडकल्यामुळे चालक घाबरून तेथून पळून गेला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. येथून जाणाऱ्या इतवारी-नागभीड पॅसेंजरला काही वेळासाठी रोखून धरण्यात आले. एका दुसऱ्या टँकरच्या मदतीने अडकलेले टँकर रुळावरून काढण्यात आले. हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. रेल्वे सुरक्षा दलाचे इतवारी येथील प्रभारी निरीक्षक पी. एल. विश्वकर्मा, उपनिरीक्षक टेंभुर्णीकर यांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास रेल्वे न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने टँकर चालकास दोन हजार रुपये दंड सुनावला.

 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात