शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हुडकेश्वर-नरसाळाच्या नागरिकांना १५ ऑगस्टपूर्वी पाणीपुरवठा करा : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:16 IST

हुडकेश्वर नरसाळा या भागातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांना नळाचे कनेक्शन देऊन पिण्याचे पाणी द्या. एकही कुटुंब पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मनपा अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच जनसंवाद कार्यक्रमात आलेल्या नागरिकांच्या समस्यांसाठी कामाचे प्रस्ताव येत्या तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा व जिल्हा प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देहुडकेश्वर येथे जनसंवाद कार्यक्रम१५-१५ दिवस साफसफाई होत नाहीपावसाळ्यापूर्वी नालासफाई करासमस्यांच्या निवेदनावर प्रस्ताव करून तीन दिवसात सादर करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वर नरसाळा या भागातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांना नळाचे कनेक्शन देऊन पिण्याचे पाणी द्या. एकही कुटुंब पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मनपा अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच जनसंवाद कार्यक्रमात आलेल्या नागरिकांच्या समस्यांसाठी कामाचे प्रस्ताव येत्या तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा व जिल्हा प्रशासनाला दिले.हुडकेश्वर येथील राधाकृष्ण सभागृहात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांकडे समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. या कार्यक्रमामुळे पालकमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती अजय बोढारे, डी.डी. सोनटक्के, नगरसेवक भगवान मेंढे, नगरसेविका स्वाती आखतकर, हाथीबेड, मडावी, डॉ. प्रीती मानमोडे, जि.प. सदस्य शुभांगी गायधने, किशोर कुंभारे, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगर पालिका, आरोग्य विभाग, साफसफाई, पाणीपुरवठा, दलित वस्तीमधील कामे, महावितरण अशा सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून संबंधित समस्यांची निवेदने त्यांना देण्यात आली. पावसाळी नाली साफसफाई, रस्त्यांची कामे, सिमेंट रस्त्यांची कामे, पाणीपुरवठ्यााच्या जलकुंभाची कामे अशा कामांचा आढावा घेण्यात आला. ४ पैकी ३ जलकुंभाची कामे पूर्ण झाली आहेत.येत्या १५ ऑगस्टपूर्वी महावितरणने हुडकेश्वर नरसाळा भागातील सर्व पथदिव्यांचे खांब लावून त्यावर दिवे लावावे, अशा सूचना देण्यात आल्या. निधीची कोणतीही कमी नाही. पण काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे असे निर्देश देण्यात आले. साफसफाईबाबत कर्मचाऱ्यांची रिक्तपदे अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक भागात १५-१५ दिवस झाडू मारणारे पोहोचत नाही. तसेच रस्ते उंच झाले आणि नागरिकांची घरे खोल झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी घरांमध्ये घुसते. सिमेंट रस्ते करताना प्रत्येक १० मीटरवर खाली पाईप टाकण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. साफसफाई मनपाचे कर्मचारी करीत नसल्याच्या तक्रारी जनसंवादमध्ये करण्यात आल्या.खुल्या जागांना संरक्षण भिंती, अनधिकृत व्यवसायावर नियंत्रण या समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. अजय बोढारे, डीडी सोनटक्के, भगवान मेंढे, उपस्थित नगरसेविका आदींनी या भागातील समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.जनसंवादानंतर पालकमंत्र्यांनी या भागाचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्यांवर प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश दिले. प्रत्येक समस्येच्या निवेदनावर कारवाई करण्याचे व त्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी जनतेला दिले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेguardian ministerपालक मंत्रीnagpurनागपूरWaterपाणी